सिंधुदुर्ग : सी-वर्ल्ड प्रकल्प होणारच : दीपक केसरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 11:20 AM2019-01-02T11:20:50+5:302019-01-02T11:22:39+5:30

सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणारा सी-वर्ल्ड प्रकल्प होणार आहे मात्र तो कोठे करायचा हे मी ठरवलं असून त्यासाठी आवश्यक जमीन सुद्धा तयार आहे. त्यासाठी लागणारी जमीनही तयार आहे. मात्र त्याठिकाणी जाणारा रस्ता, वीज, पाणी यासाठी होणारा विरोध तसेच पुढे येणाऱ्या अडचणी लक्षात घेता त्याची घोषणा आत्ता करणार नाही असा गौप्यस्फोट पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी पर्यटन महोत्सवाच्या समारोप प्रसंगी केला.

 Sindhudurg: Sea World project will be held: Deepak Kesarkar | सिंधुदुर्ग : सी-वर्ल्ड प्रकल्प होणारच : दीपक केसरकर

सावंतवाडी महोत्सवादरम्या पालकमंत्री केसरकर यांच्यासह व्यासपिठावर उपस्थित सर्वांनी स्वच्छतेची शपथ घेतली. (रुपेश हिराप)

Next
ठळक मुद्देसी-वर्ल्ड प्रकल्प होणारच : दीपक केसरकरसंभाव्य विरोध लक्षात घेऊन वेळीच नाव जाहीर करणार

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात होणारा सी-वर्ल्ड प्रकल्प होणार आहे मात्र तो कोठे करायचा हे मी ठरवलं असून त्यासाठी आवश्यक जमीन सुद्धा तयार आहे. त्यासाठी लागणारी जमीनही तयार आहे. मात्र त्याठिकाणी जाणारा रस्ता, वीज, पाणी यासाठी होणारा विरोध तसेच पुढे येणाऱ्या अडचणी लक्षात घेता त्याची घोषणा आत्ता करणार नाही असा गौप्यस्फोट पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी पर्यटन महोत्सवाच्या समारोप प्रसंगी केला.

दरम्यान रस्ता अनुदान योजनेतून सावंतवाडी शहराला पाच कोटी रुपये देण्यात येणार असून त्यातून सहा महिन्यात सावंतवाडी शहरातील रस्त्यांचा विकास दिसेल असेही त्यांनी स्पष्ट केले. सावंतवाडी पर्यटन महोत्सवाच्या समारोप सोमवारी राज्याचे गृह व वित्त राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत झाला.

यावेळी आयोजित कार्यक्रमात व्यासपीठावर नगराध्यक्ष बबन साळगावकर , माजी पोलिस उपविभागीय अधिकारी दयानंद गवस, राष्ट्रीय कबड्डीपटू सागर बांदेकर, उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, नगरसेवक आनंद नेवगी, सुरेंद्र बांदेकर, बाबू कुडतरकर, उदय नाईक, राजू बेग, सुधीर आडिवरेकर, अ‍ॅड. परिमल नाईक, नगरसेविका अनारोजीन लोबो, भारती मोरे, माधुरी वाडकर, दिपाली सावंत, दिपाली भालेकर, समृद्धी विर्नोडकर, उत्कर्ष सासोलकर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री केसरकर म्हणाले जिल्ह्याचा विकास होण्यासाठी नाना पाटेकर यांना मी खास करून बोलावले होते. त्यांच्याकडे विकासासाठी आपण केलेल्या मागणीचा राजकीय अर्थ काढून टीका झाली हे चुकीचे असून आपण जिल्ह्याच्या विकासासाठी एमटीडीसीकडे कोट्यवधी रुपये दिले मात्र त्यातील एकही रुपये खर्च नव्हता ते पैसे शासनाकडे परत जातात हे योग्य नाही.

राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न सोडविला जाईल यासाठी आपण मुख्यमंत्र्याची बोलणार आहे अगोदरच आपल्याला माहिती दिली असती तर कर्मचाऱ्यांना उपोषणास बसावे लागले नसते असे केसरकर म्हणाले.

नगराध्यक्ष साळगावकर यांनी आपल्याकडे केलेल्या मागणीनुसार जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी सहा महिन्यात ६00 तरुणांच्या हाताला काम मिळेल असा प्रकल्प सहा महिन्यात उभा राहील.


तालुक्यात क्वायरचा कारखाना

महिलांच्या हाताला रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी तालुक्यातील वेत्ये किंवा माजगाव या ठिकाणी क्वायरचा कारखाना सुरू करण्यात येणार आहे शिवाय बांदा नजीक होणारा डाटा सेंटर प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे. त्याठिकाणी अडचण आल्यास इन्सुली येथे जागा तयार आहे, सदरचा प्रकल्प जास्तीत जास्त शहराच्या जवळ आणण्याचा आपला प्रयत्न असल्याचे केसरकर म्हणाले.
 

Web Title:  Sindhudurg: Sea World project will be held: Deepak Kesarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.