सिंधुदुर्ग : कोकणात शेळ्या-मेंढ्यांची कारवणी पद्धत आजही टिकून, मेंढपाळ गावोगावी दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 10:54 AM2018-03-09T10:54:27+5:302018-03-09T10:54:27+5:30

रासायनिक खतांच्या वाढत्या वापरामुळे जमिनीची सुपिकता कमी होऊ लागल्याने सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. परिणामी कोकणात पूर्वीपासून चालत आलेली शेतात शेळ्या-मेंढ्या बसविण्याची कारवणी पद्धत आजही टिकून आहे. जिल्ह्याच्या खलाट पट्ट्यातील मेंढपाळ आपल्या फौजफाट्यासह कारवाणीसाठी गावोगाव दाखल होऊ लागले आहेत.

Sindhudurg: Caring method of goats and goats in Konkan still survive today | सिंधुदुर्ग : कोकणात शेळ्या-मेंढ्यांची कारवणी पद्धत आजही टिकून, मेंढपाळ गावोगावी दाखल

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या खलाट पट्ट्यातील मेंढपाळ फौजफाट्यासह कारवाणीसाठी गावोगाव दाखल होऊ लागले आहेत. शेतात कारवणीसाठी शेळ्या-मेंढ्यांना बांधून ठेवण्यात येते.

Next
ठळक मुद्देशेळ्या-मेंढ्यांची कारवणी पद्धत आजही टिकूनमेंढपाळ गावोगावी दाखल कोकणातील पूर्वपरंपरागत प्रथा

मिलिंद डोंगरे 

सिंधुदुर्ग : रासायनिक खतांच्या वाढत्या वापरामुळे जमिनीची सुपिकता कमी होऊ लागल्याने सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. परिणामी कोकणात पूर्वीपासून चालत आलेली शेतात शेळ्या-मेंढ्या बसविण्याची कारवणी पद्धत आजही टिकून आहे. जिल्ह्याच्या खलाट पट्ट्यातील मेंढपाळ आपल्या फौजफाट्यासह कारवाणीसाठी गावोगाव दाखल होऊ लागले आहेत.


पूर्वमशागतीसाठी पूर्वीच्या काळी रासायनिक खते नसल्याने लोक सेंद्रिय पद्धतीने शेती करीत असत. शेण व पालापाचोळ्यापासून बनविलेले खत शेतीसाठी वापरत असत. परंतु जसजशी शेती तंत्रज्ञानात प्रगती होत गेली तसतशी रासायनिक खते उपलब्ध होत गेली. रासायनिक खतांमुळे शेतीच्या उत्पन्नात वाढ होत गेली.

हे खरे असले तरी या खतांचा बेसुमार वापर होऊ लागल्याने त्याचा विपरीत परिणाम जमिनीच्या सुपिकतेवर होऊ लागला. त्यामुळे अलीकडे सेंद्रिय शेतीवर भर दिला जात आहे. जमिनीची सुपिकता वाढविणारी कारवणी पद्धत पूर्वीपासूनच कोकणात आहे.

कारवणी म्हणजे नेमके काय?

साधारणपणे हिवाळा सुरू झाला की, मेंढपाळ आपल्या शेळ्या-मेंढ्यांचा फौजफाटा घेऊन गावोगावी भटकंती करीत असतात. शेतकरी आपल्या शेतात मेंढ्या बसवून घेतात. या शेळ्या-मेंढ्यांचे मलमूत्र शेतात पडते. त्यालाच कारवणी म्हणतात. त्याने शेतीची सुपिकता वाढत असल्याचे शेतकरी सांगतात.

शेळ्या-मेंढ्यांच्या चाऱ्यांचा प्रश्न सुटतो

लेंडीखताला फार मोठी मागणी असते. शेतीबरोबरच फळबागांना हे खत वापरले जाते. या खतामुळे जमिनीचा पोत सुधारत असल्याने कारवणीसाठी शेतकरी आग्रही असतात. एका रात्री शेळ्या-मेंढ्या शेतात बसविण्यासाठी तांदूळ किंवा पैसे अशी त्यांची बिदागी असते. पाऊस पडेपर्यंत हे मेंढपाळ गावोगावी भटकंती करीत असतात. त्यातून त्यांच्या उदरनिर्वाहाबरोबरच शेळ्या-मेंढ्यांच्या चाऱ्यांचा प्रश्न सुटतो. यात हजारो रुपयांची उलाढालही होत असते.

शेळ्या-मेंढ्यांसोबत शेतातच संसार

अर्थात यात मेंढपाळांना प्रचंड मेहनत करावी लागते. थंडी, वारा, कडाक्याचे ऊन सहन करीत ते गावोगावी भटकंती करीत असतात. शेळ्या-मेंढ्यांबरोबरच त्यांना शेतात संसार थाटावा लागतो. पावसाळा सुरू होण्याअगोदर ते आपल्या घरी परततात. एकेक मेंढपाळांकडे २०० ते २५० मेंढ्या असतात.



 

Web Title: Sindhudurg: Caring method of goats and goats in Konkan still survive today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.