राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; मळगावात २४ लाखांची दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2022 01:06 PM2022-08-16T13:06:03+5:302022-08-16T13:06:43+5:30

संशयित चालकाचे गाडी टाकून जंगलात पलायन; गाडीसह एकुण ३९ लाखांचा मुद्देमाल जप्त

Major Action by State Excise Department; Liquor worth 24 lakh seized in Malgaon | राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; मळगावात २४ लाखांची दारू जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; मळगावात २४ लाखांची दारू जप्त

googlenewsNext

बांदा (सिंधुदुर्ग) : सहा चाकी मोठ्या ट्रक मधून तब्बल २४ लाखांची होणारी वाहतूक राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने रोखली आहे. मात्र कारवाईचा सुगावा लागल्यामुळे गाडीचा चालक असलेला संशयित गाडी तेथेच टाकून पळूुन गेला आहे. ही कारवाई १५ ऑगस्टला पहाटे मळगाव येथे हॉटेल कोकण क्राऊनसमोर सावंतवाडी-सातार्डा मार्गावर करण्यात आली. यात पंधरा लाखाच्या गाडीसह तब्बल ३९ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की गोवा येथून सावंतवाडीकडे येणार्‍या ट्रकमधून मोठ्या प्रमाणात दारु वाहतूक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी मळगाव येथे सापळा रचला होता. यावेळी पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास सावंतवाडीकडे एक ट्रक येताना दिसला. यावेळी त्याला थांबण्याचा इशारा केल्यानंतर संबधिताने बाजूच्या जंगलात पळ काढला. मात्र गाडीसह मोठा मुद्देमाल जप्त करण्यास पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई दुय्यम निरिक्षक प्रदिप रासकर, यांच्यासह त्यांचे सहकारी टि. बी. पाटील,संदिप कदम,गोपाळ राणे आदींनी केली.

Web Title: Major Action by State Excise Department; Liquor worth 24 lakh seized in Malgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.