Sindhudurg: मृत्यूशी झुंज देणाऱ्या वायरमनचा अखेर मृत्यू, विद्युत पोलवर काम करताना विजेच्या धक्क्याने झाला होता जखमी

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: August 4, 2023 02:13 PM2023-08-04T14:13:48+5:302023-08-04T14:14:21+5:30

कुडाळ ( सिंधुदुर्ग ) : विद्युत पोलवर काम करताना विजेच्या धक्का लागून जखमी झालेल्या वायरमनचा अखेर मृत्यू झाला. धनंजय ...

A wireman who was injured by lightning at Kudal finally died | Sindhudurg: मृत्यूशी झुंज देणाऱ्या वायरमनचा अखेर मृत्यू, विद्युत पोलवर काम करताना विजेच्या धक्क्याने झाला होता जखमी

Sindhudurg: मृत्यूशी झुंज देणाऱ्या वायरमनचा अखेर मृत्यू, विद्युत पोलवर काम करताना विजेच्या धक्क्याने झाला होता जखमी

googlenewsNext

कुडाळ (सिंधुदुर्ग) : विद्युत पोलवर काम करताना विजेच्या धक्का लागून जखमी झालेल्या वायरमनचा अखेर मृत्यू झाला. धनंजय फाले असे या मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्याच्या निधनाने पिंगुळी गावावर शोककळा पसरली.

शहरातील गवळदेव जवळील एका हॉटेलसमोर वीज वितरण कंपनीचा कर्मचारी धनंजय फाले हा विद्युत पोलवर काम करीत होता. यावेळी फाले हे वीजेचा धक्का लागून पोलवरच चिकटून गंभीर जखमी झाले. ही घटना २१ जुलै रोजी घडली होती.

जखमी अवस्थेत फाले याच्यावर जिल्हा रूग्णालयात आणि त्यानंतर गोवा बांबोळी येथे उपचारासाठी दाखल केले. गेली अनेक दिवस फाले हा मृत्यूशी झुंज देत होता. अखेर आज, शुक्रवारी सकाळी त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या निधनाने पिंगुळी गावावर शोककळा पसरली आहे. त्याच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Web Title: A wireman who was injured by lightning at Kudal finally died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.