सातारा : तिहेरी अपघातात दोन वाहनांचे चालक गंभीर, दूध वाहतूक करणार टँकर अन् कंटेनर यांच्यात धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 07:14 PM2018-02-05T19:14:34+5:302018-02-05T19:16:47+5:30

फलटण-पुणे रस्त्यावर येथील जिंती नाका परिसरात कंटेनर व दूध टँकरची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले. हा अपघात सोमवारी सकाळी सातच्या सुमारास झाला.

Satara: Two vehicles driver seriously injured in a triple crash, truck collides with tanker and container | सातारा : तिहेरी अपघातात दोन वाहनांचे चालक गंभीर, दूध वाहतूक करणार टँकर अन् कंटेनर यांच्यात धडक

सातारा : तिहेरी अपघातात दोन वाहनांचे चालक गंभीर, दूध वाहतूक करणार टँकर अन् कंटेनर यांच्यात धडक

Next
ठळक मुद्देतिहेरी अपघातात दोन वाहनांचे चालक गंभीरफलटणच्या जिंती नाक्यावर दुर्घटना दूध वाहतूक करणार टँकर अन् कंटेनर यांच्यात धडक

फलटण (सातारा) : फलटण-पुणे रस्त्यावर येथील जिंती नाका परिसरात कंटेनर व दूध टँकरची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले. हा अपघात सोमवारी सकाळी सातच्या सुमारास झाला.



याबाबत माहिती अशी की, जिंती नाका रस्त्यालगत सोमवारी सकाळी (एमएच ११ एबी ९८९८) हा मोठा ट्रक उभा होता. त्यावेळी पुणेच्या दिशेने दूध घेऊन जाणारा टँकर (एमएच ११ एएल ५३७५) व पुण्याहून येणारा कंटेनर (एमएच ४६ बीबी १८४५) यांच्यात समोरासमोर धडक झाली.

ही धडक एवढी भीषण होती की कंटेनरचा चक्काचूर झाला. डिझेल टाकीला गळती लागल्यामुळे रस्त्यावरून डिझेल वाहत होते. त्यानंतर अपघातग्रस्त वाहन ट्रकलाही धडकले. यामध्ये तिन्ही वाहनांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले आहेत.

Web Title: Satara: Two vehicles driver seriously injured in a triple crash, truck collides with tanker and container

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.