जतमध्ये पावसासाठी गाढवांचे लग्न...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 11:21 PM2018-09-26T23:21:06+5:302018-09-26T23:21:10+5:30

The wedding of donkeys for rain ... | जतमध्ये पावसासाठी गाढवांचे लग्न...

जतमध्ये पावसासाठी गाढवांचे लग्न...

googlenewsNext

जत : सनई-चौघड्याचा मंगलमय सूर... बॅँडची धून... पावण्या-रावळ्यांची लगीनघाई... पुष्प पाकळ्यांच्या अक्षतांचा सुगंधी वर्षाव... ना फटाक्यांचा आवाज, ना डॉल्बीचा दणदणाट, अशा मंगलमय वातावरणात बुधवारी सायंकाळी जत येथील विठ्ठलनगर परिसरात एक आगळावेगळा विवाहसोहळा झाला. शहरातील शेकडो वºहाडींची उपस्थिती होती. हा विवाहसोहळा होता गाढवांचा...
वरुणराजाच्या अवकृपेमुळे वैतागलेल्या नागरिकांनी जत शहरात गाढवांचे लग्न लावण्याचा निर्णय घेतला. यावर्षी पावसाने बगल दिल्याने तालुक्यातील खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. रब्बी हंगामही वाया जाण्याच्या मार्गावर आहे. पाऊस नसल्यामुळे रब्बी पेरण्या खोळंबल्या आहेत. वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी विठ्ठलनगर येथील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन गाढवांचे लग्न लावून दिले. शहराच्या मुख्य रस्त्यावरुन त्यांची सवाद्य मिरवणूक काढली.
कमी पाऊस व काम नसल्यामुळे जत शहरातील गाढवांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे लग्न लावून मिरवणूक काढण्यासाठी आसंगी (जत) येथून गाढवांची जोडी आणण्यात आली. खलाटी (ता. जत) येथून वाजंत्री आले होते. सुरुवातीस गाढवांना सजवून त्यांचे लग्न लावण्यात आले.
यावेळी विठ्ठलनगर, वसंतनगर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर निगडी कॉर्नर, महाराणा प्रताप चौक, जयहिंद चौक, गांधी चौक, वाचनालय चौक व थोरली वेस येथून मिरवणूक काढण्यात आली. पोलीसपाटील मदन माने-पाटील यांच्याहस्ते गाढवांची पूजा करून पावसासाठी वरुणराजाला साकडे घालण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते पापा सनदी, रमेश माळी, दत्ता कांबळे, मिलिंद शिंदे, बाळू कांबळे, दादासाहेब कांबळे, सदा कांबळे, अंबादास माळी, चिवडाप्पा चौगुले, मुºयाप्पा माने, संतोष माने, राम पवार, रवींद्र कांबळे, यल्लाप्पा बामणे, सुनील सूर्यवंशी, अनिल डोंबाळे, महेश तंगडी, ज्योत्याप्पा बेळुंखी उपस्थित होते.

Web Title: The wedding of donkeys for rain ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.