वारणा नदी, चांदोली धरणाच्या प्रकल्पावर फुली; सांगलीला कृष्णेतूनच शुद्ध पाणी देण्याची योजना

By अविनाश कोळी | Published: February 28, 2024 03:19 PM2024-02-28T15:19:29+5:302024-02-28T15:19:45+5:30

सांगली : वारणा नदीही नको अन् चांदोली धरणही नको. कृष्णा नदीतील उपलब्ध पाणी अधुनिक तंत्रज्ञानाव्दारे शुध्द  करुन मुबलक पाणी ...

Plan to provide clean water to Sangli from Krishna river | वारणा नदी, चांदोली धरणाच्या प्रकल्पावर फुली; सांगलीला कृष्णेतूनच शुद्ध पाणी देण्याची योजना

वारणा नदी, चांदोली धरणाच्या प्रकल्पावर फुली; सांगलीला कृष्णेतूनच शुद्ध पाणी देण्याची योजना

सांगली : वारणा नदीही नको अन् चांदोली धरणही नको. कृष्णा नदीतील उपलब्ध पाणी अधुनिक तंत्रज्ञानाव्दारे शुध्द  करुन मुबलक पाणी देण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी स्वतंत्र तज्ज्ञांचीही नियुक्ती करण्याचा विचार आहे, असे स्पष्ट करीत महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त सुनिल पवार यांनी   दोन्ही योजनांच्या वादावर पडदा टाकला. दोन्ही प्रस्तावीत पाणी योजना खर्चिक असल्याने ते प्रस्ताव प्रशासनाने प्रलंबित ठेवल्याचे स्पष्ट केले.

दुषित पाणी पुरवठ्यावरुन  सामाजिक संघटनांच्या बैठकीत आयुक्त सुनिल पवार यांनी वारणा की चांदोली पाणी पुरवठा योजनेवर आपली भूमिका स्पष्ट केली. पाणी टंचाईमुळे कृष्णा नदी वारंवार कोरडी पडत असल्याने भविष्यात पाण्यासाठी स्वतंत्र स्त्रोत शोधावा लागणार असल्याने वारणेतून पाणी आणण्याच्या २५० कोटीच्या योजनेचा आग्रह मदनभाऊ पाटील युवा मंचने धरला होता, दुसरीकडे  नागरीक जागृती मंचने चांदोली धरणातून पाणी आणण्याचा आग्रह धरला होता.

यावरुन आंदोलनही झाले होते. मदनभाऊ पाटील युवा मंचने वारणा पाणी योजनेसाठी आंदोलन केले होते. यावेळी प्रशासनाने वारणेचा प्रस्ताव शासनाला पाठवण्याचे आश्‍वासन दिले होते. नागरीक जागृती मंचने चांदोलतून थेट पाईपलाईनव्दारे पाणी आणण्याचा आग्रह धरला होता. यावरुन युवा मंच आणि नागरीक जागृती मंच यांच्यात राजकीय वादही निर्माण झाले होते.    

कालच्या बैठकीत बोलताना आयुक्त पवार म्हणाले, मुबलक,शुध्द पाणी पुरवठा व्हावा यासाठी  जुन्या वितरण नलिका बदलणे गरजेचे आहे.कृष्णेचे पाणी दुषित असल्याने प्रस्तावीत वारणा पाणी योजनेचा प्रस्ताव चर्चेला आला.यातून मिळणारे पाणीही दुषित असल्याचे दिसून आले. चांदोलीतून थेट पाईपलाईनव्दारे सांगलीला पाणी आणण्याचा प्रस्ताव चर्चेला आला.१४०० कोटीचा खर्च यासाठी येईल असे सांगीतले जाते. यात मनपा ५०० कोटीचा हिस्सा घालावा लागणार आहे.

हा खर्च परवडणार का? शासन अनुदानावर महापालिका चालते आहे. या सर्व बाबीचा विचार करुन आहे ते पाणी अधुनिक तंत्रज्ञानाने शुध्द देता येईल का? यासाठी प्रस्ताव करण्याचे काम सुरु केले आहे,यासाठी स्वतंत्र तज्ञांची नियुक्ती करण्याचा विचार आहे.१६००-१७०० कोटीची योजना करण्यापेक्षा  उपलब्ध पाणी शुध्द आणि मुबलक देण्यासाठी नविन तंत्रज्ञान वापरण्याचे नियोजन आहे. आयुक्त सुनिल पवार यांच्या स्पष्ट खुलाशामुळे  वारणा आणि चांदोली पाणी योजना सध्या तरी गुंडाळल्या आहेत असे स्पष्ट झाले आहे.

Web Title: Plan to provide clean water to Sangli from Krishna river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.