प्राचार्यांच्या धमकीने विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 04:25 AM2017-11-29T04:25:32+5:302017-11-29T04:25:44+5:30

प्राचार्यांनी अर्वाच्च व अश्लील भाषेत शिवीगाळ करून नापास करण्याची धमकी दिल्याने येथील डी. फार्मसीच्या पहिल्या वर्षात शिकणा-या विद्यार्थ्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

 The attempt of suicide of the student by threatening the teachers | प्राचार्यांच्या धमकीने विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

प्राचार्यांच्या धमकीने विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Next

कवठेमहांकाळ (जि. सांगली) : प्राचार्यांनी अर्वाच्च व अश्लील भाषेत शिवीगाळ करून नापास करण्याची धमकी दिल्याने येथील डी. फार्मसीच्या पहिल्या वर्षात शिकणा-या विद्यार्थ्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. अक्षय नागनाथ लोकरे (वय १९, रा. टेंभुर्णी, ता. माढा, जि. सोलापूर) असे विद्यार्थ्याचे नाव असून, त्याची प्रकृती गंभीर आहे.
अक्षयच्या वडिलांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. लांडगेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील नूतन कॉलेज आॅफ फार्मसीमध्ये पहिल्या वर्षात अक्षय शिकत आहे. तो आजारी असल्याने शनिवारी दुपारी न सांगता महाविद्यालयातून घरी गेला. सोमवारी परत आला असता, शिक्षिका स्नेहल शिंदे यांनी न विचारता घरी गेल्याबद्दल दंड भरावा लागेल, असे सांगितले. तो नियमानुसार पन्नास रुपये दंड भरण्यास तयार झाला. परंतु शिंदे यांनी पाचशे रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. यावर अक्षयने नियमानुसार दंड भरणार व वर्गात बसणार, अशी भूमिका घेतली. त्यानंतर शिंदे यांनी प्राचार्य अझरुद्दीन आत्तार यांना बोलावले. आत्तार यांनी अक्षयला अर्वाच्च भाषेत शिवागीळ केली, अपमानास्पद वागणूक देऊन नापास करण्याची धमकी दिली व उद्यापासून वर्गात येऊ नकोस, असे सुनावले. याची भीतीपोटी अक्षयने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्या मित्रांनी तातडीने कवठेमहांकाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु प्रकृती गंभीर बनल्याने त्याला मिरज शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.

Web Title:  The attempt of suicide of the student by threatening the teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.