सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सौद्यात १५ बेदाणा व्यापाऱ्यांना बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 02:05 PM2017-11-10T14:05:57+5:302017-11-10T14:23:59+5:30

व्यापाऱ्यांच्या झिरो पेमेंटसाठी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महिनाभर बेदाणा सौदे बंद होते. पंधरा व्यापारी वगळता उर्वरितांनी अडत्यांचे सर्व पैसे दिल्यामुळे बेदाणा सौद्यास प्रारंभ झाला. पंधरा व्यापाऱ्यांनी अडत्यांचे पैसे दिले नसल्यामुळे त्यांना सौद्यात सहभाग घेऊ दिला नाही. सर्व पैसे देईपर्यंत त्यांच्यावर बंदी घालण्याचा निर्णयही बाजार समिती प्रशासनाने घेतला.

 15 banana traders ban on sale in Sangli Agricultural Produce Market Committee | सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सौद्यात १५ बेदाणा व्यापाऱ्यांना बंदी

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सौद्यात १५ बेदाणा व्यापाऱ्यांना बंदी

Next
ठळक मुद्देपहिल्या दिवशी ३४०० बॉक्सचा सौदा हलक्या दर्जाच्या बेदाण्यास प्रति किलो ९०, तर चांगल्या दर्जाच्या बेदाण्यास १५० रुपये दर सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आढावा बैठक

सांगली  ,दि. १० : व्यापाऱ्यांच्या झिरो पेमेंटसाठी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महिनाभर बेदाणा सौदे बंद होते. पंधरा व्यापारी वगळता उर्वरितांनी अडत्यांचे सर्व पैसे दिल्यामुळे बेदाणा सौद्यास प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी तीन हजार ४०० बॉक्स बेदाण्याची आवक झाली असून, प्रति किलोला ९० ते १५० रुपयांचा दर मिळाला. पंधरा व्यापाऱ्यांनी अडत्यांचे पैसे दिले नसल्यामुळे त्यांना बेदाणा सौद्यात सहभाग घेऊ दिला नाही. सर्व पैसे देईपर्यंत त्यांच्यावर बंदी घालण्याचा निर्णयही बाजार समिती प्रशासनाने घेतला.


बाजार समितीमध्ये सभापती प्रशांत शेजाळ, बेदाणा व्यापारी मनोज मालू, विनायक हिंगमिरे, राजेंद्र कुंभार, बाजार समितीचे सचिव प्रकाश पाटील आदींच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली. अन्य राज्यांतील व्यापाऱ्यांकडून स्थानिक व्यापारी, अडत्यांचे शंभर टक्के पैसे मिळाले की नाहीत, याचा आढावा घेण्यात आला.

यावेळी पंधरा व्यापाऱ्यांनी अद्याप सर्व पैसे देऊन व्यवहार पूर्ण केला नसल्यामुळे, त्यांना सौद्यामध्ये सहभाग देऊ नये, अशी सूचना काहींनी मांडली. त्यानुसार प्रशांत शेजाळ यांनी, जोपर्यंत हे १५ व्यापारी बेदाण्याचे सर्व पैसे देणार नाहीत, तोपर्यंत त्यांना सौद्यात सहभाग घेता येणार नाही, असे स्पष्ट केले. याला सर्व व्यापाऱ्यांनी सहमती दिल्याने या व्यापाऱ्यांना सौद्यासाठी बंदी घातली.


दरम्यान, निघालेल्या बेदाणा सौद्यामध्ये तीन हजार ४०० बेदाणा बॉक्सची आवक झाली होती. हलक्या दर्जाच्या बेदाण्यास प्रति किलो ९० रुपये, तर चांगल्या दर्जाच्या बेदाण्यास १५० रुपये दर मिळाल्याचे बाजार समितीचे सचिव प्रकाश पाटील यांनी सांगितले.

Web Title:  15 banana traders ban on sale in Sangli Agricultural Produce Market Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.