बंदीनंतरही सांगलीत बेदाण्याची उधळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 11:29 PM2017-10-04T23:29:05+5:302017-10-04T23:29:08+5:30

After the ban, Sanyalite raises the issue | बंदीनंतरही सांगलीत बेदाण्याची उधळण

बंदीनंतरही सांगलीत बेदाण्याची उधळण

Next



अशोक डोंबाळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सौद्याच्या नावाखाली उधळण करून लाखो रुपयांचे बेदाण्याचे नुकसान टाळण्यासाठी उधळण बंदीचे फलक बाजार समितीने झळकावले. तरीही बुधवारी सौद्यावेळी प्रचंड प्रमाणात उधळण झाली. त्यामुळे काही शेतकºयांनी याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, सौद्यात बेदाण्याचा किलोला सरासरी ९० ते १५० रुपये दर होता.
व्यापाºयांनी सौदे काढताना बेदाण्याची उधळण करू नये, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बाजार समितीकडे केली होती. त्यानुसार बाजार समितीने सौदे करताना व्यापाºयांनी बेदाण्याची उधळण करू नये, असे फलक सौद्याच्या ठिकाणी लावले आहेत. शिवाय सौद्यावेळी बाजार समितीचे कर्मचारीही तेथे उपस्थित असतात. सांगली बाजार समितीच्या आवारामध्ये बुधवारी बेदाण्याचे सौदे झाले. यावेळी बेदाणा उधळण्यास बंदीचे फलक असलेल्या ठिकाणीच प्रत्येक बॉक्समधील बेदाण्याची उधळण करून दराची बोली लावली जात होती. विशेष म्हणजे बाजार समितीचे कर्मचारीही सौद्यावेळी तेथे उपस्थित होते. त्यांचेही याकडे दुर्लक्ष होते. व्यापाºयांना काही शेतकºयांनी बेदाणा उधळण्यास बंदी असल्याचे सांगितल्यानंतरही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. बॉक्समधील उधळलेला बेदाणा गोळा करण्यात काही लोक मग्न होते. पूर्ण सौद्यात उधळलेला बेदाणा गोळा केल्यानंतर ५० किलोची तीन ते चार पोती भरली. हा बेदाणा कोठे जातो, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. प्रत्येक सौद्यात एकूण दोनशे किलोच्या बेदाण्याचे नुकसान सहन करावे लागत आहे. मात्र बाजार समितीकडून व्यापाºयांवर कोणतीच कारवाई केली जात नाही.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्ते व पदाधिकाºयांचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. बुधवारी झालेल्या बेदाणा सौद्यात एक किलो हिरवा बेदाण्यास ९० ते १५०, पिवळा बेदाणा ९० ते १३० आणि काळ्या बेदाण्यास ५० ते ६० रुपये दर मिळाला आहे. दिवाळी जवळ आल्यामुळे बेदाण्याच्या दरात पाच ते दहा रुपयांची वाढ झाल्याचे व्यापाºयांनी सांगितले.
बुधवारी सांगली बाजार समितीत झालेल्या सौद्यावेळी ३२ गाड्यांतून ३२० टन बेदाण्याची आवक झाली असल्याचे बेदाणा व्यापाºयांनी सांगितले.
२५० ग्रॅमपेक्षा कमी वजन : कारवाईचा इशारा
शेतकºयांचा बेदाणा व्यापाºयांनी उधळू नये, अशी बाजार समितीने सूचना दिली आहे. तरीही व्यापारी बेदाण्याची उधळण करीत असतील, तर संबंधित अडत्यावर कारवाई करण्यात येईल. एका बॉक्समध्ये केवळ २५० ग्रॅमचीच तूट शेतकरी सहन करेल. बिलामध्ये २५० ग्रॅमपेक्षा कमी वजन दाखविल्यास शेतकºयांनी बाजार समितीकडे तक्रार करावी, संबंधित अडत्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सचिव प्रकाश पाटील यांनी दिला.
बेदाणा उधळल्यास सौदे बंद पाडू : महेश खराडे
सौद्यावेळी बेदाण्याची उधळण करू नये, अशी विनंती महिन्याभरापूर्वी बाजार समिती आणि बेदाणा व्यापाºयांना केली होती. बाजार समितीने सौद्याच्या ठिकाणी बेदाणा उधळू नये, असे फलकही लावले आहेत. तरीही व्यापारी बेदाण्याची उधळण करीत असतील, तर ते गंभीर आहे. शेतकºयांच्या घामाची थट्टा आम्ही खपवून घेणार नाही. शुक्रवारच्या सौद्यात बेदाणा उधळल्यास सौदे बंद पाडण्यात येतील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते महेश खराडे यांनी दिला.

Web Title: After the ban, Sanyalite raises the issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.