रत्नागिरी जिल्ह्यात १२०० लोकांमागे फक्त एकच पोलीस, कामाचा ताण, डबलड्युटीच्या त्रासाने कर्मचारी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 04:16 PM2018-01-09T16:16:18+5:302018-01-09T16:23:40+5:30

रत्नागिरी जिल्ह्याची लोकसंख्या १८ लाख आहे़ त्यावर नियत्रंण ठेण्यासाठी ४ हजार पोलिसांची आवश्यकता आहे़ मात्र, सध्या रत्नागिरी जिल्ह्यात पंधराशेच पोलिसांची कुमक तैनात असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण अधिक वाढल्याचे चित्र दिसत आहे.

In Ratnagiri district, only one police, work force, double duty employee harassment | रत्नागिरी जिल्ह्यात १२०० लोकांमागे फक्त एकच पोलीस, कामाचा ताण, डबलड्युटीच्या त्रासाने कर्मचारी हैराण

रत्नागिरी जिल्ह्यात १२०० लोकांमागे फक्त एकच पोलीस, कामाचा ताण, डबलड्युटीच्या त्रासाने कर्मचारी हैराण

Next
ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यात १२०० लोकांमागे फक्त एकच पोलीसकामाचा ताण, डबलड्युटीच्या त्रासाने कर्मचारी हैराण

रत्नागिरी : जिल्ह्याची लोकसंख्या १८ लाख आहे़ त्यावर नियत्रंण ठेण्यासाठी ४ हजार पोलिसांची आवश्यकता आहे़ मात्र, सध्या रत्नागिरी जिल्ह्यात पंधराशेच पोलिसांची कुमक तैनात असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण अधिक वाढला असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना डबलड्युटीचा त्रास सहन करावा लागत आहे.

सध्या जिल्ह्यात ४ हजार पोलिसांची गरज आहे. परंतु, जिल्ह्यात सध्या १२०० नागरिकांमागे एक पोलीस असे समीकरण आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस शहरीकरण वाढत आहे़. वाढत्या शहरीकरणाबरोबरच गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे़ त्यामुळे पोलिसांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे़.

रत्नागिरी जिल्ह्याची लोकसंख्या १८ लाखांच्या आसपास आहे़ परंतु, त्यावर नियत्रंण ठेवणारे पोलीस बळ मात्र फारच कमी असल्याचे दिसत आहे़ सध्या १२०० लोकांमागे एक पोलीस काम करत आहे़ त्यामुळे हे चित्र बदलण्यासाठी पोलिसांचे मनुष्यबळ वाढणे गरजेचे आहे़.


सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीदवाक्य डोळ्यासमोर ठेऊन जनतेचे सदैव रक्षण करणाऱ्या पोलिसांना मात्र या अपुऱ्या मनुष्यबळामुळे डबलड्युटीचा त्रास सहन करावा लागत आहे़.

१८ लाख लोकसंख्या असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात पोलिसांची संख्या मात्र १५०० इतकीच आहे़ त्यामुळे जिल्ह्यात घडणाऱ्या गुन्ह्यांवर नियत्रंण ठेवणे कठीण बनले आहे़ त्याचाच परिणाम म्हणून जिल्ह्यात घरफोडीचे प्रमाण अधिक वाढले आहे. त्यामुळे पोलिसांची कुमक वाढवणे गरजेचे आहे.

रत्नागिरी जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या दृष्टीने जिल्ह्यासाठी ४००० हजार पोलिसांची आवश्यकता आहे़ परंतु, सद्यस्थितीत केवळ १५०० पोलीस कर्मचारी ४ हजार पोलिसांची कामगिरी पार पाडत आहेत.

जिल्हा पोलिसांच्या ताफ्यात आणखी अडीच हजार पोलिसांची कमतरता आहे़ त्यामुळे पोलिसांचे संख्याबळ वाढविणे ही काळाची गरज आहे़. जेणेकरून लोकांचे रक्षण करणाऱ्या पोलिसांवरचा थोडासा तरी भार हलका होईल़ तसेच डबलड्युटीच्या त्रासातूनही त्यांची सुटका होईल. या गोष्टीची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेणे गरजेचे आहे़

सध्या जिल्ह्यामध्ये १२०० नागरिकांमागे १ पोलीस काम करत असल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांची पळापळ होताना दिसते. जिल्ह्यातील सर्वच पोलीस स्थानकांमध्ये कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच गुन्ह्यांवर अंकुश ठेण्यासाठी जिल्ह्यात कमीतकमी ४ हजार पोलिसांची तैनात असणे गरजेचे आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात व गुन्ह्यांवर नियत्रंण मिळविण्यात यश येणार आहे. जिल्ह्यातील पोलिसांची संख्या ४ हजारावर गेल्यास ४५० नागरिकांमागे एक पोलीस असे प्रमाण राहणार आहे. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांवर पडणारा ताणही कमी होईल. यासाठी जिल्ह्यात पोलीस कर्मचाऱ्यांची भरती होणे ही काळाची गरज बनली आहे.

रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यालाही पोलीस कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे. शहर पोलीस ठाण्यात सध्या ८८ कर्मचारी कार्यरत आहेत.

सर्व शहराचा भार हा त्यांच्याच डोक्यावर आहे. त्यामुळे शहरातील गुन्ह्यांवर नियत्रंण ठेवण्यासाठी १२० पोलिसांचा ताफा शहर पोलीस स्थानकात असणे गरजेचे आहे. यामुळे पोलिसांवर असलेला कामाचा ताणही कमी होईल.

रत्नागिरी शहरात विनयभंगांचे प्रमाणही वाढले आहे. परंतु, अनेक पीडित तरुणी पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी पुढे येत नाहीत. यासाठी महाविद्यालय व शाळांमध्ये तक्रार पेट्या ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुली आता तक्रारी देण्यासाठी पुढे येऊ लागल्या आहेत. पण त्यासाठी अधिक पोलिसांची गरज आहे.

Web Title: In Ratnagiri district, only one police, work force, double duty employee harassment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.