सलग ७२ तास पोलिस आॅनड्युटी बजावून कडक पहारा , सातारा जिल्ह्याची शांतता अबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 05:21 PM2018-01-04T17:21:27+5:302018-01-04T17:24:19+5:30

सातारा जिल्ह्यात पाल, औंध, मांढरदेवी यात्रा आणि ३१ डिसेंबरला नववर्षांचे स्वागत आदी उत्सवांचे कार्यक्रम सुरू होते. त्यातच पुणे जिल्ह्यात कोरेगाव-भीमा येथे झालेल्या घटनेमुळे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. त्यात संपूर्ण राज्यात हिंसाचाराच्या घटना घडत होत्या. मात्र, जिल्हा पोलिसांनी सलग ७२ तास ड्युटी बजावून कडक पहारा देत जिल्ह्यात अपवादात्मक घटना सोडता बंद शांततेत हाताळला गेला.

Continuous security for the 72-hour police unauthorized operation | सलग ७२ तास पोलिस आॅनड्युटी बजावून कडक पहारा , सातारा जिल्ह्याची शांतता अबाधित

सलग ७२ तास पोलिस आॅनड्युटी बजावून कडक पहारा , सातारा जिल्ह्याची शांतता अबाधित

Next
ठळक मुद्देनववर्ष, कोरेगाव भीमा येथील घटना, महाराष्ट्र बंदची हाक यामुळे ताणसातारा जिल्ह्यातील पोलिसांवर मोठ्या प्रमाणात बंदोबस्ताचा ताण

सातारा : सातारा जिल्ह्यात पाल, औंध, मांढरदेवी यात्रा आणि ३१ डिसेंबरला नववर्षांचे स्वागत आदी उत्सवांचे कार्यक्रम सुरू होते. त्यातच पुणे जिल्ह्यात कोरेगाव-भीमा येथे झालेल्या घटनेमुळे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. त्यात संपूर्ण राज्यात हिंसाचाराच्या घटना घडत होत्या. मात्र, जिल्हा पोलिसांनी सलग ७२ तास ड्युटी बजावून कडक पहारा देत जिल्ह्यात अपवादात्मक घटना सोडता बंद शांततेत हाताळला गेला.

डिसेंबर महिन्याच्या अखेरी महाबळेश्वर, पाचगणी या थंड हवेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करत असतात. त्यात गेल्या आठवड्यापासून पालचा खंडोबा, मांढरगडावरील काळूबाई, औंधची यमाईदेवी येथील यात्रा सुरू असल्यामुळे सातारा जिल्ह्यातील पोलिसांवर मोठ्या प्रमाणात बंदोबस्ताचा ताण असतो. त्यामुळे जिल्ह्यातील १५० पोलिस अधिकारी, २५०० कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक सुटी व रजा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यात ३१ डिसेंबर रोजी कोणत्याही अनुचित प्रकार घडून नये, यासाठी कडक बंदोबस्त आवश्यकता असते.

महाबळेश्वर व पाचगणीमध्ये वाहतूक कोंडी होत असते. त्याचबरोबर यात्रा काळात लाखो भाविकांची गर्दी होत असताना पोलिसांवर वाहतूक व गर्दीचे नियंत्रण करण्याचे काम सुरू होते. त्याचवेळी कोरेगाव-भीमा येथे हिंसाचाराची घटना घडली.  त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात जाळपोळ, दगडफेक आदी घटना घडण्यास सुरुवात झाली.

राज्यात घडणाऱ्या घटनांचा जिल्ह्यात लगेच पडसाद उमटू लागले. फलटण आणि कºहाड येथे काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. सातारा पोलिसांनी सतर्कता दाखवून तत्काळ घटनास्थळी कारवाई करण्यास सुरुवात केली.

दुसरीकडे बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. त्याच दिवशी प्रत्येक पोलिस ठाणेनिहाय विविध पक्ष, संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि जाती-धर्माच्या लोकांची शांतता बैठक घेतली. त्यांना अफवांवर विश्वास ठेवू नका, शांततेत बंद पाळा, असे आवाहन केले.

दुसऱ्या दिवशी सकाळपासून सर्वत्र बंद पुकारल्याने कोणत्याही हिंसाचाराच्या घटना होऊ नयेत, जी काही दुकाने उघडी होती त्यांना बंद करण्याचे आवाहन केले. तसेच संशयित कार्यकर्त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून प्रत्येक चौकात आणि संवेदनशील ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

काही ठिकाणी दगडफेक व हिंसक कारवाई होत असल्याचे निदर्शनास येतच पोलिसांनी तत्काळ संशयितांना ताब्यात घेऊन जमाव पांगवला. त्यामुळे कोणतीही मोठी हिंसाचाराची घटना घडली नाही. पोलिसांच्या दक्षतेमुळे जिल्ह्यातील बंद शांततेत हाताळला गेला.

जिल्ह्यात काही ठिकाणी अपवादात्मक दगडफेक व दुकान फोडीच्या घटना घडल्या. त्यावेळी पोलिसांनी तत्काळ संशयितांना ताब्यात घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, त्यांना सोडवण्यासाठी जमावाने पोलिस ठाण्याबाहेर गर्दी केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्या संशयितांना समज देऊन सोडले. पोलिसांच्या समयसूचकतेमुळे होणारा अनर्थ टळला.

 

Web Title: Continuous security for the 72-hour police unauthorized operation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.