पालखी मार्गावर दुचाकीची समोरा समोर धडक, एक युवक ठार, तीन जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2023 08:47 PM2023-07-09T20:47:05+5:302023-07-09T20:47:35+5:30

या घटनेमुळे जेऊरसह नीरा परिसरात हळ हळ व्यक्त केली जाता आहे. 

Two-wheeler collides head-on on Palkhi road, one youth killed, three injured | पालखी मार्गावर दुचाकीची समोरा समोर धडक, एक युवक ठार, तीन जखमी

पालखी मार्गावर दुचाकीची समोरा समोर धडक, एक युवक ठार, तीन जखमी

googlenewsNext

नीरा : वाहतुकीसाठी नेहमीच धोकादायक असलेल्या पुणे - पंढरपूर पालखी महामार्गावर आज पुन्हा अपघात झाला. दोन दुचाकीस समोरासमोर धडकल्याने एका युवकाचा जागीच मृत्यू झाला असून, तिघेजण जखमी आहेत. याबाबतची माहिती नीरा पोलिसांनी सायंकाळी दिली. 

पुणे - पंढरपूर पालखी महामार्गावरील नीरा ते वाल्हा दरम्यानच्या पिंपरे हद्दीत नीरा डावा कालव्यावरील पुलावर दोन दुचाकी समोरा समोर धडकल्या. या अपघातात किरण रामदास धुमाळ (वय २८) रा. जेऊर (ता.पुरंदर) यांचा मृत्यू झाला असून त्यांच्या मावशी मिना कांतीलाल दरेकर (वय ४०) या जखमी झाल्या आहेत. धुमाळ ही आपल्या एम. एच १२ जे. पी. ३९३० या दुचाकीवरून नीरा येथून जेऊर कडे निघाले होते.

जेजुरी बाजूने मोहन विनायक रोंदळे (वय ३२) व भिमा बाळु  मधुकर (वय ३०) रा. शिंदवणे (ता.हवेली) हे दोघे एम.एच. १२ ए.डी १४९४ दुचाकीवरून भरधाव आले. रोंधळे गाडी चावलत होते. ते विरुद्ध दिशेला येऊन धुमाळ यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये चौघेही जखमी झाले. किरण धुमाळ यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाल. धुमाळे हे पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट मध्ये नोकरीस होते. ते रविवारची सुट्टी असल्याने मिना दरेकर मावशी सोबत ऊस लागणीसाठी जेऊरला निघाले होते. या घटनेमुळे जेऊरसह नीरा परिसरात हळ हळ व्यक्त केली जाता आहे. 
 

Web Title: Two-wheeler collides head-on on Palkhi road, one youth killed, three injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.