लष्कर भागात सराफी पेढीवर दरोड्याच्या तयारीतील चोरटे गजाआड

By नितीश गोवंडे | Published: December 28, 2023 04:01 PM2023-12-28T16:01:44+5:302023-12-28T16:02:19+5:30

अंधाराचा फायदा घेऊन त्यांच्याबरोबर असलेले दोन चोरटे पसार

Thieves preparing to rob Sarafi village in Lashkar area | लष्कर भागात सराफी पेढीवर दरोड्याच्या तयारीतील चोरटे गजाआड

लष्कर भागात सराफी पेढीवर दरोड्याच्या तयारीतील चोरटे गजाआड

पुणे : लष्कर भागातील एका सराफी पेढीवर दरोडा घालण्याच्या तयारीतील बिहारमधील चोरट्यांच्या टोळीला पोलिसांनी पकडले. बिशप स्कूलजवळ ही कारवाई करण्यात आली. अरमान कमल ग्वाला (२५), सुमीतकुमार उर्फ राहुलकुमार रामसिंग यादव (३०), सोनूकुमार रामनाथ यादव (२५, तिघे रा. बिहार) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी त्यांच्याबरोबर असलेल्या दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, अंधाराचा फायदा घेऊन चोरटे पसार झाले आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे यांनी लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

लष्कर भागातील सराफी पेढीवर दराेडा टाकण्याच्या तयारीत बिहारमधील चोरट्यांची टोळी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. बिशप स्कूलजवळ असलेल्या मोकळ्या जागेत चोरटे मध्यरात्री थांबले होते. ओळख पटू नये म्हणून चोरट्यांनी माकडटोपी घातली होती. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून ग्वाला, यादव यांना पकडले. अंधाराचा फायदा घेऊन त्यांच्याबरोबर असलेले दोन चोरटे पसार झाले. त्यांच्याकडून कटावणी, स्क्रु ड्रायव्हर, टोच्या. गुजरातमधील वाहन क्रमांकाच्या बनावट पाट्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक दशरथ पाटील करत आहेत.

Web Title: Thieves preparing to rob Sarafi village in Lashkar area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.