शहिद रविंद्र धनावडे यांना पुण्यात मानवंदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 08:35 PM2017-08-27T20:35:58+5:302017-08-27T20:36:14+5:30

जम्मू काश्मिर येथे दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेले जवान रविंद्र धनावडे यांना पुण्याच्या लोहगाव विमानतळ येथे शासकिय इमामात मानवंदना देण्यात आली

Shaheed Ravindra Dhawde to salute in Pune | शहिद रविंद्र धनावडे यांना पुण्यात मानवंदना

शहिद रविंद्र धनावडे यांना पुण्यात मानवंदना

Next

विमाननगर, दि. 27  : जम्मू काश्मिर येथे दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेले जवान रविंद्र धनावडे यांना पुण्याच्या लोहगाव विमानतळ येथे शासकिय इमामात मानवंदना देण्यात आली. शहिद जवान धनावडे यांचे पार्थिव अहमदाबाद येथून खास विमानाने पुण्यात आणण्यात आले. केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर, खासदार अनिल शिरोळे, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ़ सिद्धार्थ धेंडे, माजी नगरसेवक अशोक कांबळे यांनी यावेळी पुष्पचक्र अर्पण करून श्रध्दाजंली वाहीली. सीआरपीएफच्या वतीने पश्चिम विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक राजकुमार, उपमहानिरीक्षक विनोद विजय,समादेशक हरविंदरसिंग व सशस्र जवानांच्या तुकडीने सलामी दिली.
यावेळी शहिद जवान धनवडे यांचे चुलते चंद्रकांत धनवडे यांना शोक अनावर झाला. केंद्रीय गृहराज्यमंत्री अहिर यांनी धनवडे यांचे सांत्वन करून सर्व देशवासीय व सरकार आपल्या दु:खात सहभागी असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्या कुटुंबियांची चौकशी केली. लोहगाव विमानतळ येथून शहिद जवान धनावडे यांचे पार्थिव त्यांच्या सातारा येथील मूळगावी पाठविण्यात आले.
केंद्रीय गृहराज्यमंत्री हसंराज अहिर यांनी सरकारच्या वतीने श्रध्दाजंली अर्पण केली. आतंकवाद समूळ नष्ट करणे ही सरकारची प्रमुख भूमिका आहे. देशाचे रक्षण करणाºया जवानाला आतंकवाद्याशी लढताना वीरमरण येणे ही अत्यंत दु:खद बाब आहे. त्यांना धोका निर्माण होऊ नये व चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी सरकार कटिबध्द आहे. या अत्यंत दुर्देवी प्रसंगी शहिद जवान धनावडे यांच्या कुंटुबिंयासोबत सरकार व संपुर्ण देशातील नागरिक आहेत.

Web Title: Shaheed Ravindra Dhawde to salute in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.