आता PMPML बसमध्ये पोलिसांनाही काढावे लागणार तिकीट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 12:05 PM2022-11-18T12:05:02+5:302022-11-18T12:06:20+5:30

यापूर्वी पुण्यातल्या पुण्यात जाण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना मोफत प्रवासाची मुभा होती...

Now police also have to issue tickets in PMPML buses pune latest news | आता PMPML बसमध्ये पोलिसांनाही काढावे लागणार तिकीट

आता PMPML बसमध्ये पोलिसांनाही काढावे लागणार तिकीट

googlenewsNext

पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून पोलिसांना पीएमपी प्रवास हा मोफत होता. आता मात्र पोलिसांना पीएमपीतून प्रवास करताना रीतसर इतर प्रवाशांप्रमाणे तिकीट काढावे लागणार आहे. पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी नुकतेच या संदर्भातील आदेश काढले आहेत.

कामानिमित्त पुण्यातल्या पुण्यात जाण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना कालपर्यंत मोफत प्रवासाची मुभा होती. या प्रवास खर्चापोटी राज्य सरकारच्या गृह विभागाकडून अनुदान दिले जाते. मात्र, नव्या शासन निर्णयामुळे १९९१ सालापासून सुरू असलेला पीएमपीचा हा मोफत प्रवास आता मात्र थांबणार आहे.

यासंदर्भात पीएमपी प्रशासनाने पीएमपी वाहक, तिकीट तपासणीस, पर्यवेक्षकीय सेवकांना आदेश दिले आहेत. दरम्यान, मोफत प्रवासाच्या बदल्यात पोलीस प्रशासनाकडून पीएमपीला देण्यात येणारे अनुदान वेळोवेळी मिळत नव्हते. हे अनुदान मिळवण्यासाठी पीएमपी प्रशासनाला अनेकदा पत्रव्यवहार करावा लागत असे. लाखो रुपये अनुदान मिळत नसल्याने पीएमपीला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत होता, या कारणांमुळे हा मोफत प्रवास बंद करण्यात आल्याचे पीएमपी प्रशासनाद्वारे सांगण्यात आले.

Web Title: Now police also have to issue tickets in PMPML buses pune latest news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.