वेदविज्ञानाच्या अभ्यासातून निर्माण होईल नवे वैश्विक जीवन : मुरली मनोहर जोशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 04:40 PM2018-01-11T16:40:52+5:302018-01-11T16:43:40+5:30

वेदविज्ञानाच्या अभ्यासातून निर्माण होणार्‍या चेतनेतून विज्ञाननिष्ठ नवे वैश्‍विक जीवन निर्माण होईल, असा विश्‍वास माजी केंद्रीय मंत्री खासदार डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी व्यक्त केला.

New global life will emerge from the study of science: Murli Manohar Joshi | वेदविज्ञानाच्या अभ्यासातून निर्माण होईल नवे वैश्विक जीवन : मुरली मनोहर जोशी

वेदविज्ञानाच्या अभ्यासातून निर्माण होईल नवे वैश्विक जीवन : मुरली मनोहर जोशी

Next
ठळक मुद्देस्थापत्य विज्ञान आणि स्वास्थ्य विज्ञानावर या संमेलनात होणार चर्चाप्रदर्शन शनिवार ता. १३ जानेवारीपर्यंत सकाळी ९ ते रात्री ८ पर्यंत सर्वांसाठी राहणार खुले

पुणे : प्राचीन काळापासून कृषिविज्ञान, आहारशास्त्र, संगीतशास्त्र, भाषाशास्त्र, ध्वनीशास्त्र, सं‘याशास्त्र, परमाणू उर्जा याबाबतीत आपण अन्य देशांच्या तुलनेत खूपच प्रगती केली होती. आपल्या देशातील प्रयोगात्मक विज्ञानाचा स्तर समृृध्द होता. वेदविज्ञानाच्या अभ्यासातून निर्माण होणार्‍या चेतनेतून विज्ञाननिष्ठ नवे वैश्‍विक जीवन निर्माण होईल, असा विश्‍वास माजी केंद्रीय मंत्री खासदार डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी व्यक्त केला.

विज्ञान भारती, डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ यांच्या वतीने डेक्कन कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या तिसर्‍या ‘विश्‍व वेद विज्ञान संमेलना’चे उद्घाटन करताना डॉ. जोशी बोलत होते. चिन्मय मिशनचे माजी प्रमुख स्वामी तेजोमयानंद, विज्ञान भारतीचे अध्यक्ष डॉ. विजय भटकर, संघटनमंत्री डॉ. जयंत सहस्रबुध्दे, डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. अरविंद जामखेडकर, कुलगुरु डॉ. वंदन शिंदे, विज्ञान भारतीचे संस्थापक प्रा. के. आय. वासू, रा. स्व. संघाचे प्रचारक प्रा. सुरेश सोनी व्यासपीठावर उपस्थित होते.

स्वामी तेजोमयानंद म्हणाले, ‘धर्म माणसाला भौतिक प्रगती व आध्यात्मिक मुक्तीकडे घेऊन जातो. वेदांमध्ये मानवाचे भले करणारे जीवन जगण्याची पध्दती सांगितली आहे. परंतु त्याचे वाचन न करताच त्यावर टीका केली जाते. वेदांमध्ये सांगितलेले ज्ञान समजून घेतले पाहिजे.’

संस्कृतचा सगळ्यात मोठा शब्दकोष निर्माण करण्याचे काम डेक्कन कॉलेजने हाती घेतले असल्याची माहिती डॉ. भटकर यांनी यावेळी दिली. ते पुढे म्हणाले, ‘भाषा, व्याकरण, वाक्यांची रचना उच्च शिक्षणात शिकविण्याची गरज आहे. नवीन पीढीला प्रेरणा देणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे.’

प्रा. सोनी म्हणाले, ‘मानवाच्या विकासासाठी अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घातली पाहिजे. त्यासाठी वैदिक विज्ञानाचा सखोल अभ्यास करण्याची आवश्यकता आहे.’

स्थापत्य विज्ञान आणि स्वास्थ्य विज्ञानावर या संमेलनात चर्चा होणार आहे. वेदविज्ञान सृष्टी हे प्रदर्शन शनिवार ता. १३ जानेवारीपर्यंत सकाळी ९ ते रात्री ८ पर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. अशी माहिती डॉ. सहस्रबुध्दे यांनी यावेळी दिली. अरुण तिवारी यांच्या ‘गीतारहस्य-आधुनिक काळात अर्थबोधन’ या विषयावरील ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. गिरीश जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

प्रा. रामनाथ झा, डॉ. संपदानंद मिश्रा, डॉ. पेरी भास्कर राव (संस्कृत), राजेश भूतकर, प्रा. जी. एस. मूर्ती  (विज्ञान व तंत्रज्ञान) डॉ. अनिल राजवंशी, डॉ. मधुसूदन पेन्ना, डॉ. रजतकुमार प्रधान (योगा व मनाची चेतना) प्रा. एस. आर. वाळिंबे, प्रा. के. सी. मल्होत्रा, डॉ. गणेश महाबला (पुरातत्व व मानवशास्त्र), प्रा. जी. बी. देगलूरकर व कैलाश राव (आर्किटेक्चर), डॉ. सुनीता सिंग सेनगुप्ता, डॉ. कृष्णा कुमार, डॉ. एस. आर. कृष्णामूर्ती, अरुण वाखुलू (वेद व व्यवस्थापन), प्रा. पी. आर. मुकुंदा (वेद व इलेक्टॉनिक्स), डॉ. एस. एल. चौधरी, प्रा. मदन थनगवलेयू, डॉ. के. के. क्षीरसागर (कृषि व गोविज्ञान), अ‍ॅड. शंकर निकम, अ‍ॅड. भास्कर आव्हाड (मनुष्यस्वभाव व सामाजिक शास्त्र) आणि डॉ. आर. डी. लेले, डॉ. मुकुंद भोले व डॉ. रमा जयसुंदर (आरोग्य) यांनी विविध विषयांच्या चर्चासत्रांमध्ये सहभाग घेतला.

Web Title: New global life will emerge from the study of science: Murli Manohar Joshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.