पुणे खंडपीठाबाबत मुख्यमंत्र्यासोबत होणार बैठक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 02:18 PM2018-03-03T14:18:46+5:302018-03-03T14:18:46+5:30

 पुणे येथील खंडपीठाबाबात अधिवेशन काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अधिवेशन काळात येत्या शुक्रवारी किंवा बैठक आयोजित करण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी पुणे बार असोसिएशनला दिले.

The meeting with the Chief Minister about the Pune Bench soon | पुणे खंडपीठाबाबत मुख्यमंत्र्यासोबत होणार बैठक 

पुणे खंडपीठाबाबत मुख्यमंत्र्यासोबत होणार बैठक 

googlenewsNext
ठळक मुद्दे पीएमआरडीएकडे खंडपीठासाठीच्या १०० एकर जागेची मागणी करण्यात येणारन्यायालयाच्या परिसरात आवश्यक त्या नागरी सुविधांची तातडीने उपलब्धता करुन देण्यात येईल

पुणे खंडपीठाबाबत मुख्यमंत्र्यासोबत होणार बैठक 
पालकमंत्र्यांचे पुणे बार असोसिएशनला आश्वासन 
पुणे:  पुणे येथील खंडपीठाबाबात अधिवेशन काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अधिवेशन काळात येत्या शुक्रवारी किंवा बैठक आयोजित करण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी पुणे बार असोसिएशनला दिले. पी.एम.आर.डी.ए. कडे पुणे उच्च न्यायालयाच्या खंडपीठासाठी १०० एकर जागेची मागणी करणार असल्याचे संकेत देखील त्यांनी यावेळी दिले. तसेच न्यायालयाच्या परिसरात आवश्यक त्या नागरी सुविधांची तातडीने उपलब्धता करुन देण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुणे बार असोसिएशनला दिले. 
  पालकमंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी पुणे बार असोसिएशनसोबत पुण्यातील खंडपीठाविषयी चर्चा करण्यासाठी सर्किट हाऊस येथे बैठक  आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पुणे बार असोसिएशनचे नवनियुक्त अध्यक्ष अ‍ॅड. सुभाष पवार, उपाध्यक्ष अ‍ॅड.भूपेंद्र गोसावी,  अ‍ॅड.रेखा करंडे, माजी अध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र दौंडकर, अ‍ॅड. हेमंत झंजाड, अ‍ॅड. संतोष घुले, अ‍ॅड. दत्ता भाडळे आदी उपस्थित होते.  
   गेल्या महिन्यात राज्य सरकारने  मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूर खंडपीठाला मान्यता देत खंडपीठासाठी जागा, तसेच १०० कोटींची तरतूद देखील देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शिवाजीनगर न्यायालय परिसरात वकिलांमध्ये एकच गोंधळ व अस्वस्थता पसरली. त्यानंतर पुण्याला खंडपीठ न दिल्याच्या निषेधार्थ सत्र न्यायालयासह जिल्ह्यातील वकिलांनी न्यायालयीन कामकाजावर एकदिवसीय बहिष्कार टाकला होता. तसेच पालकमंत्र्यांनी न्यायालयात उपस्थित राहत राज्य सरकारची पुणे खंडपीठाविषयीची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली होती. यानंतर पालकमंत्र्यांनी आपल्या मुलाच्या लग्नाचे कारण सांगत सदर खंडपीठाविषयी चर्चा सध्या करणे शक्य नसल्याचे सांगत स्वत:हून चर्चेला बोलवणार असल्याचे पत्रांद्वारे बार असोसिएशनला कळविले होते. त्यानुसार ही शनिवारची बैठक बोलाविण्यात करण्यात आली होती. 
................................
  पालक मंत्र्यांसोबत झालेल्या एक तासाच्या बैठकीत पुणे खंडपीठाविषयीचे सकारात्मक भूमिका असल्याचे संगितले. त्यांनी मुख्यमंत्र्यासोबत पुणे येथील शिष्टमंडळाशी अधिवेशन काळातील येत्या शुक्रवारी किंवा पुढील आठवड्यात बैठक घडवून आणणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच पीएमआरडीएकडे खंडपीठासाठीच्या ११ एकर जागेची मागणी करण्यात येणार आहे. न्यायालय परिसरातील  पार्कींग, स्वच्छतागृह, उपहारगृह,सीसीटीव्ही, यांसारख्या नागरी सुविधा लवकरात लवकर पुरविण्यात येतील असे सांगितले.
                     अ‍ॅड. सुभाष पवार, अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन  

Web Title: The meeting with the Chief Minister about the Pune Bench soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.