निवडणूक होणार वेळेमध्येच, पुणे बार असोसिएशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 05:25 AM2018-01-17T05:25:46+5:302018-01-17T05:25:49+5:30

सनद पडताळणी आणि त्याप्रमाणे मतदारयादी तयार करण्यास विलंब लागण्याची शक्यता असल्याने यंदा पुणे बार असोसिएशनच्या निवडणुकीची पारंपरिक तारीख टळण्याची चर्चा होती

Within the time of the election, the Pune Bar Association | निवडणूक होणार वेळेमध्येच, पुणे बार असोसिएशन

निवडणूक होणार वेळेमध्येच, पुणे बार असोसिएशन

Next

पुणे : सनद पडताळणी आणि त्याप्रमाणे मतदारयादी तयार करण्यास विलंब लागण्याची शक्यता असल्याने यंदा पुणे बार असोसिएशनच्या निवडणुकीची पारंपरिक तारीख टळण्याची चर्चा होती. मात्र, निवडणूक ३१ जानेवारी अथवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचा निर्णय पुणे बार असोसिएशनच्या बैठकीत सोमवारी घेण्यात आला.
बार कौन्सील आॅफ महाराष्ट्र आणि गोवाच्या निवडणुकीची प्रक्रिया ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निवडणुकीसाठी सनद पडताळणी केलेल्या वकिलांची यादी बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र आणि गोवाच्या वतीने १० जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात येणार होती. मात्र, ती यादी आता ४ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध होणार आहे. पुणे बार असोसिएशनची वार्षिक निवडणूक काही वर्षांपासून ३१ जानेवारी रोजी होत असते. या पार्श्वभूमीवर, पुणे बार असोसिएशनच्या प्रथेनुसार पावत्या काढून मतदार यादी तयार करून निवडणूक घ्यायची की निवडणूक लांबवून बार कौन्सिलच्या यादीप्रमाणे निवडणूक घ्यायची, हा प्रश्न निर्माण झाला होता.
यातून मार्ग काढण्यासाठी पुणे बार असोसिएशनच्या वतीने सोमवारी शिवाजीनगर न्यायालयातील हिरवळीवर वकिलांची सभा घेतली. बारचे अध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र दौंडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस असोसिएशनचे पदाधिकारी, माजी अध्यक्ष, वकील उपस्थित होते. या बैठकीत पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ वकिलांनी आपली भूमिका मांडली. बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र व गोवाच्या निवडणुकीसाठी मतदारयादीत सध्या गोंधळ आहे. त्यात अनेक त्रुटी आहेत. ही मतदार यादी तयार होण्यास तसेच त्यातील चुका दुरुस्त करण्यात बराच वेळ जाणार आहे.

Web Title: Within the time of the election, the Pune Bar Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.