जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरण: 'मी बॉम्बस्फोटांच्या धमाक्यांचा आवाज ऐकला, पण...'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 12:59 PM2022-06-08T12:59:08+5:302022-06-08T13:02:08+5:30

जर्मन बेकरीजवळील एका महिला डॉक्टरची साक्ष व उलटतपासणी...

german bakery bombing case lady doctor said I heard bomb blasts, but i am not present there | जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरण: 'मी बॉम्बस्फोटांच्या धमाक्यांचा आवाज ऐकला, पण...'

जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरण: 'मी बॉम्बस्फोटांच्या धमाक्यांचा आवाज ऐकला, पण...'

Next

पुणे : जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणात मुख्य आरोपी व ‘इंडियन मुजाहिदीन’ या दहशतवादी संघटनेचा संस्थापक यासीन भटकळ याच्याविरोधात विशेष न्यायालयात सुनावणी सुरू असून, मंगळवारी जर्मन बेकरीजवळ क्लिनिक असलेल्या एका महिला डॉक्टरची साक्ष व उलटतपासणी घेण्यात आली. मी बॉम्बस्फोटांच्या धमाक्यांचा आवाज ऐकल्यानंतर धावत खाली गेले आणि लोकांची सुटका करण्यासाठी मदत करू लागले. मात्र मी प्रत्यक्ष घटना घडताना पाहिली नाही असे त्यांनी न्यायालयात सांगितले.

कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरी येथे १३ फेब्रुवारी २०१० रोजी सायंकाळी सहा वाजून ५० मिनिटांनी बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटात १७ व्यक्तींचा मृत्यू झाला होता आणि ५६ जण गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणात ‘एटीएस‘ने केलेल्या तपासात भटकळ यानेच बॉम्ब ठेवल्याचे ‘सीसीटीव्ही’वरून निष्पन्न झाले होते. त्यानंतर यासीन भटकळ, मिर्झा हिमायत बेग यांच्यासह सात जणांवर ‘एटीएस’ने विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सोमवारी सर्व साक्षीदारांचे प्रतिज्ञापत्र दाखल करून घेण्यात आले आहे. यासीन भटकळतर्फे बाजू मांडण्यासाठी पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने ॲड. एस. व्ही. रणपिसे आणि ॲड. यशपाल पुरोहित यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या प्रकरणात भटकळ याच्या सहभागाबाबत बचाव पक्षातर्फे साक्षीदारांची उलट तपासणी घेण्यात येत आहे. त्या अंतर्गत जर्मन बेकरीच्या मालक स्मिता खरोसे यांच्यानंतर एका महिला डॉक्टरांची साक्ष व उलटतपासणी घेण्यात आली. जर्मन बेकरी परिसरात त्यांचे क्लिनिक होते. जोरदार धमाका झाल्याचा आवाज झाल्यानंतर मी खाली आले आणि लोकांची सुटका करण्यासाठी प्रयत्न करू लागले. तिथे आग लागलेली पाहिली नाही, असे बचाव पक्षाचे वकील ॲड. पुरोहित यांनी सांगितले.

Web Title: german bakery bombing case lady doctor said I heard bomb blasts, but i am not present there

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.