वढू हे पर्यटनक्षेत्र नव्हे तर तीर्थ क्षेत्र घोषित करा; शिवेंद्रराजे भोसलेंची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 06:50 PM2023-01-22T18:50:00+5:302023-01-22T18:50:26+5:30

छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या नावावरून राजकारण होतंय

Declare Vadhu as a pilgrimage zone and not a tourist zone Shivendraraje Bhosle's demand | वढू हे पर्यटनक्षेत्र नव्हे तर तीर्थ क्षेत्र घोषित करा; शिवेंद्रराजे भोसलेंची मागणी

वढू हे पर्यटनक्षेत्र नव्हे तर तीर्थ क्षेत्र घोषित करा; शिवेंद्रराजे भोसलेंची मागणी

googlenewsNext

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या नावावरून राजकारण होतंय. अफजल खान स्वतःच्या सीमेचं रक्षण करायला आला होता हे वक्तव्य हास्यास्पद आहे. आपलं मतदान टिकावे व चर्चेत राहावे हा काहींचा हेतू आहे. संभाजी महाराज यांची समाधी असलेले वढू हे पर्यटन नव्हे तर तीर्थ क्षेत्र घोषित करा, अशी मागणी आमदार शिवेंद्रराजे भाेसले यांनी जन आक्राेश माेर्चामध्ये केली.

लव जिहाद, धर्मांतर, गोहत्या याबाबत कडक कायदे करण्यात यावेत तसेच फाल्गुन अमावस्या हा धर्मवीर दिन साजरा करण्यात यावा या मागण्यांसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने रविवारी या आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या माेर्चाची सुरवात लाल महाल येथून झाली व डेक्कन परिसरातील संभाजी महाराजांच्या स्मारकाजवळ त्याचा समारोप करण्यात आला. त्यावेळी शिवेंद्रराजे बाेलत हाेते. यावेळी तुकाराम महाराज यांचे वंशज शिवाजी महाराज मोरे, तेलंगणाचे आमदार राजासिंह ठाकूर, हिंदू राष्ट्र सेनेचे धनंजय देसाई, विक्रम पावसकर, मिलिंद एकबोटे आदी उपस्थित हाेते.

शिवेंद्रराजे भाेसले म्हणाले, आता जात, धर्म सोडून एकत्र यायची वेळ आली आहे. अशीच एकजूट ठेवा. आमच्या मुलांबाळांवर येणारे संकट दूर करणे, हिंदु धर्माचे रक्षण करायला आम्ही एकत्र आलो आहोत. देव, देश आणि धर्म यामध्ये तडजोड नाही. ज्यांचे यावर प्रेम आहे त्यांनी याबाबत जागं राहील पाहिजे.

आदिलशाहीचा ताे नांगर बारामतीपर्यंत गेला 

आदिलशाहीच्या उकिरडयावरून आलेल्या सरदारांनी पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवला. त्यावर शिवाजी महाराजांची सोन्याचा नांगर फिरवला. आदिलशाहीचा ताे नांगर बारामतीपर्यंत गेला आहे असे म्हणत अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीचे अजित पवारांवर टीका केली. शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्यावर बेतालपणे वक्तव्ये केले जात असल्याचे मत धनंजय देसाई यांनी व्यक्त केले  

लव्ह जिहादच्या माध्यमातून मुलींना फसवलं जात आहे 

 हिंदू आक्रोश नाही तर हिंदू गर्जना आहे. पुण्यश्वरच्या नावाने पुण्याची ओळख आहे. लव जिहाद चा लासुर काढून फेकायचा आहे. टुरिस्ट च्या नावावर जे महाराष्ट्र मध्ये येतात जे गरीब लोकांना पैशांच्या जोरावर धर्मपरिवर्तन करतात हे थांबायला हवे. लव्ह जिहादच्या माध्यमातून मुलींना फसवलं जात आहे. जो धर्मांतर करायला येईल त्याला 3 फूट जमिनीत गाडा. यावेळी हजाराेंच्या संख्येने माेर्चामध्ये सहभागी झाल्याचे राजासिंह ठाकूर यांनी सांगितले. 

Web Title: Declare Vadhu as a pilgrimage zone and not a tourist zone Shivendraraje Bhosle's demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.