गुरुवारी ‘हे’ स्तोत्र म्हणा, गुरुबळ मिळवा; धनवृद्धी, सुख-समृद्धी योग शक्य, होईल गुरुकृपा!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 10:48 AM2024-05-21T10:48:13+5:302024-05-21T10:48:30+5:30

Guruwar Guru Stotra: गुरुबळ, गुरुकृपा लाभण्यासाठी गुरुवारी गुरुचे एक स्तोत्र पठण किंवा श्रवण करावे, असे सांगितले जाते.

every guruwar chant this guru stotram increase health and wealth brihaspati kavach stotra | गुरुवारी ‘हे’ स्तोत्र म्हणा, गुरुबळ मिळवा; धनवृद्धी, सुख-समृद्धी योग शक्य, होईल गुरुकृपा!

गुरुवारी ‘हे’ स्तोत्र म्हणा, गुरुबळ मिळवा; धनवृद्धी, सुख-समृद्धी योग शक्य, होईल गुरुकृपा!

Guruwar Guru Stotra: ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रह नियमित अंतराने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतात. यामुळे अनेक योग, शुभ योग, विचित्र योग जुळून येत असतात. काही योग हे अत्यंत अद्भूत फलदायी ठरतात. तर काही योग संमिश्र किंवा प्रतिकूल प्रभावकारक असतात. नवग्रहांपैकी काही ग्रहांचा आठवड्यातील दिवसांवर अंमल असतो, असे सांगितले जाते. त्यामुळे त्या दिवशी किंवा त्या वारी त्या ग्रहांच्या संदर्भात काही गोष्टी केल्यास त्याचा फायदा होऊ शकतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जात आहे. 

रविवार या दिवसावर नवग्रहांचा राजा सूर्य याचा प्रभाव अधिक असतो, असे म्हटले जाते. त्याप्रमाणे सोमवार या दिवसावर चंद्राचा अंमल असतो. तसाच गुरुवार या दिवसावर नवग्रहांचा गुरु बृहस्पती म्हणजेच गुरु ग्रहाचा अंमल असतो. कुंडलीत गुरु ग्रहाची स्थिती महत्त्वाची मानली जाते. गुरु ग्रहाची स्थिती मजबूत असेल, तर अनेक शुभ लाभ प्राप्त होऊ शकतात. तर गुरु कमकुवत असेल तर गुरुबळ लाभत नाही, असे म्हटले जाते. गुरुबळ आणि गुरुकृपा लाभावी, घरात सुख-समृद्धी, धनवृद्धी व्हावी, अशी इच्छा असेल, तर गुरुवारी गुरुचे एक प्रभावी स्तोत्र म्हणावे. याचा सकारात्मक प्रभाव पडू शकतो, असे सांगितले जाते. हे स्तोत्र म्हणता येणे शक्य नसेल, तर श्रवण करावे. गुरुवारी आवर्जून या स्तोत्र पठण किंवा श्रवण करावे, असे म्हटले जाते.

बृहस्पति कवच स्तोत्र

अभीष्टफलदं देवं सर्वज्ञम् सुर पूजितम्।
अक्षमालाधरं शांतं प्रणमामि बृहस्पतिम् ॥

बृहस्पतिः शिरः पातु ललाटं पातु मे गुरुः।
कर्णौ सुरगुरुः पातु नेत्रे मे अभीष्ठदायकः ॥

जिह्वां पातु सुराचार्यो नासां मे वेदपारगः।
मुखं मे पातु सर्वज्ञो कंठं मे देवतागुरुः ॥

भुजावांगिरसः पातु करौ पातु शुभप्रदः।
स्तनौ मे पातु वागीशः कुक्षिं मे शुभलक्षणः ॥

नाभिं केवगुरुः पातु मध्यं पातु सुखप्रदः।
कटिं पातु जगवंद्य ऊरू मे पातु वाक्पतिः ॥

जानुजंघे सुराचार्यो पादौ विश्वात्मकस्तथा।
अन्यानि यानि चांगानि रक्षेन्मे सर्वतो गुरुः॥

इत्येतत्कवचं दिव्यं त्रिसंध्यं यः पठेन्नरः।
सर्वान्कामानवाप्नोति सर्वत्र विजयी भवेत्॥

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुस्साक्षात्परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥

अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया।
चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः॥

अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं।
तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः ॥

अनेकजन्मसंप्राप्तकर्मबन्धविदाहिने ।
आत्मज्ञानप्रदानेन तस्मै श्री गुरवे नमः ॥

मन्नाथः श्रीजगन्नाथो मद्गुरुः श्रीजगद्गुरुः।
ममात्मासर्वभूतात्मा तस्मै श्री गुरवे नमः ॥

बर्ह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम्,
द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्।
एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतं,
भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ॥

 

Web Title: every guruwar chant this guru stotram increase health and wealth brihaspati kavach stotra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.