मोठी बातमी! पुण्यात तब्बल ४ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त; पुणे पोलीसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 11:28 AM2024-02-19T11:28:29+5:302024-02-19T11:29:23+5:30

यावेळी पोलिसांनी ३ ड्रग्ज तस्करांना अटक केली आहे...

Big news! Drugs worth Rs 4 crore seized in Pune; Action of Pune Police | मोठी बातमी! पुण्यात तब्बल ४ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त; पुणे पोलीसांची कारवाई

मोठी बातमी! पुण्यात तब्बल ४ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त; पुणे पोलीसांची कारवाई

- किरण शिंदे 

पुणेपुणे शहरात तब्बल ४ कोटी रुपयांचे अमली पदार्थ पोलिसांनी केली जप्त केले आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली. या कारवाईत पुणे पोलिसांनी तब्बल ४ कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त केल्याची माहिती मिळत आहे. ही कारवाई शहरातील मध्यभागी असणाऱ्या पेठ परिसरात करण्यात आलेली आहे. यामुळे ड्रग्ज तस्करांचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उघडकीस आले आहे. यावेळी पोलिसांनी ३ ड्रग्ज तस्करांना अटक केली आहे.

पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार रुजू झाल्यानंतरची ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. या कारवाईची माहिती देण्यासाठी आज (सोमवारी) दुपारी बारा वाजता ते पत्रकार परिषद घेतली. यावेळी कारवाईबद्दल माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून पुणे शहराला ड्रग्ज तस्करांनी विळखा घातल्याचे दिसत आहे. परराज्यातून येणारे लोक, राज्यातील तसेच देशातील विविध भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या शहरात लक्षणीय आहे. यामुळे तरूण मुलेही ड्रग्जच्या आहारी जात आहेत.

यापूर्वी पुण्यातील ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर २ कोटीचे ड्रग्स जप्त करण्यात आले होते. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या ससून हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारातून १ किलो ७५ ग्रॅम चे मेफिड्रोन ड्रग्स जप्त केले होते. जप्त केलेल्या MD म्हणजेच मेफिड्रोनची किंमत तब्बल २ कोटी रुपये इतकी होती. या प्रकरणात ललीत पाटीलला अटक करण्यात आली होती. त्यानंतर ललीत पाटीलचे पूर्ण राज्यातील कनेक्शन उघड झाले होते. 

Web Title: Big news! Drugs worth Rs 4 crore seized in Pune; Action of Pune Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.