दुर्दैवी! मतदान साहित्य वाटप केंद्रावर जात असताना शिक्षकाचा अपघाती मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 05:16 PM2022-12-17T17:16:46+5:302022-12-17T17:46:02+5:30

तालुक्यातील कंधारवाडी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये उपशिक्षक म्हणून कार्यरत होते...

Accidental death of a teacher while going to polling material distribution center | दुर्दैवी! मतदान साहित्य वाटप केंद्रावर जात असताना शिक्षकाचा अपघाती मृत्यू

दुर्दैवी! मतदान साहित्य वाटप केंद्रावर जात असताना शिक्षकाचा अपघाती मृत्यू

googlenewsNext

वेल्हे (पुणे ) : वेल्हे तालुक्यात मतदान साहित्य वाटप केंद्रावर दुचाकीवरून जात असताना ट्रकची धडक बसून शिक्षकाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही दुर्दैवी घटना आज (दि. १७) वेल्हे तालुक्यातील धानेप गावच्या हद्दीत घडली आहे. सागर नामदेव देशमुख (वय. ३३ वारंगुसी, ता. अकोले, जि. नगर) असे असून ते वेल्हे तालुक्यातील कंधारवाडी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये उपशिक्षक म्हणून कार्यरत होते. 

तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी देशमुख यांची मतदान अधिकारी क्र. ३ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती अशी माहिती वेल्ह्याचे तहसीलदार शिवाजी शिंदे यांनी दिली. शिक्षक देशमुख हे पानशेतकडून कादवे मार्गे दुचाकी क्रमांक एम एच १४- सी बी ७३१४ ने वेल्हे याठिकाणी मतदान साहित्य वाटप केंद्रावर येत असताना धानेप गावच्या हद्दीत हा अपघात घडला. एम एच-१२ एम व्ही ५१९० ह्या क्रमांकाच्या ट्रकची व दुचाकीची धडक झाली. दरम्यान त्यांना उपचारासाठी वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. परमेश्वर हिरास यांनी दिली.

वेल्ह्याचे गट शिक्षणाधिकारी कमलाकांत म्हेत्रे म्हणाले, अतिशय प्रामाणिक, कार्यतत्पर अशा शिक्षकाचा दुर्देवी मृत्यू झाल्याने पूर्ण शिक्षण विभागात हळहळ व्यक्त केली जात आहे. देशमुख हे तीन वर्ष शिक्षण सेवकाचा कार्यकाल संपल्याने सेवा नियमित करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे मंजुरीसाठी होता. या घटनेबाबत वेल्हे पोलिस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे अंमलदार औदुंबर अडवाल यांनी दिली.

Web Title: Accidental death of a teacher while going to polling material distribution center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.