पिंपरीत प्लॉट खरेदीच्या बहाण्यानं आठ जणांना ७२ लाखांना लुबाडला; त्यानंतर आरोपीचा कोरोनानं मृत्यू झाला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 03:36 PM2021-09-07T15:36:14+5:302021-09-07T15:36:22+5:30

आरोपीचा कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर गुन्हा दाखल; त्याच्या बँक खात्यावर हे पैसे आहेत का, या प्रकारात कोणी सहभागी होते का, याचा तपास सुरू

Under the pretext of buying a plot in Pimpri, eight people were robbed of Rs 72 lakh; The accused was later killed by Corona | पिंपरीत प्लॉट खरेदीच्या बहाण्यानं आठ जणांना ७२ लाखांना लुबाडला; त्यानंतर आरोपीचा कोरोनानं मृत्यू झाला

पिंपरीत प्लॉट खरेदीच्या बहाण्यानं आठ जणांना ७२ लाखांना लुबाडला; त्यानंतर आरोपीचा कोरोनानं मृत्यू झाला

Next
ठळक मुद्देआरोपीने आणखी नागरिकांकडून पैसे घेतल्याची शक्यता

पिंपरी : प्लॉट खरेदी करून देतो, असे एकाने खोटे सांगितले. त्यातून आठ लोकांकडून ७२ लाख १४ हजार रुपये घतेले. मात्र, त्यांना कोणाताही प्लॉट खरेदी करून दिला नाही. तसेच पैसेही परत न करता त्याने फसवणूक केली. त्यातच त्याचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे नागरिकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. जानेवारी २०१९ ते एप्रिल २०२१ या कालावधीत ही घटना घडली.

मयूर ज्ञानेश्वर कुंभार (वय २८, रा. गणेशनगर, थेरगाव) यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. संजय मारोतराव फुलझले (वय ४४, रा. बाणेर रस्ता), असे मयत आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्लॉट खरेदी करून देतो, असे सांगून आरोपी फुलझले याने २०१९ पासून नागरिकांकडून पैसे घतेले. फिर्यादीकडून चार लाख रुपये घेतले. तसेच दिलीप चव्हाण यांच्याकडून चार लाख, शोभा राजू साळूंके यांच्याकडून १० लाख, गुलाब नामदेव झारगड यांच्याकडून १० लाख एक हजार, आनंद भास्कर वाघमारे यांच्याकडून सहा लाख ११ हजार, मंदार अप्पासाहेब क्षिरसागर यांच्याकडून २५ लाख, मोहम्मद साकूर यांच्याकडून १० लाख ५१ हजार, पृथ्वीनाथ प्रभूनाथ यांच्याकडून दोन लाख ५१ हजार रुपये घतले. आरोपीने या सर्वांना प्लॉट घेऊन देण्याचे अश्वासन दिले होते. मात्र, प्लॉट घेऊन देत नसल्याने या सर्व नागरिकांनी आरोपीकडे पैसे परत देण्याचा तगादा लावला. दरम्यान आरोपीला कोरोना संसर्ग होऊन त्यचा मृत्यू झाला. त्यामुळे फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेतली. 

दरम्यान, आरोपीने आणखी नागरिकांकडून पैसे घेतल्याची शक्यता आहे. त्यामुळे फसवणुकीचा आकडा वाढू शकतो. आरोपीसह इतर कोणी या पैशांचा वापर केला आहे का, त्याच्या बँक खात्यावर हे पैसे आहेत का, या प्रकारात त्यांच्याबरोबर कोणी सहभागी होते का, याचा तपास सुरू आहे, असे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अजित काकडे यांनी सांगितले.

Web Title: Under the pretext of buying a plot in Pimpri, eight people were robbed of Rs 72 lakh; The accused was later killed by Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.