टोमॅटोबाग शेतातच टाकली उपटून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 12:58 AM2018-04-14T00:58:11+5:302018-04-14T00:58:11+5:30

चालू वर्षातील उन्हाळी हंगामात मुबलक पाण्याचा पुरवठा उपलब्ध असल्याने व गतवर्षी टोमॅटोला बाजारभाव मिळाल्याने याही वर्षी जुन्नर तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी लखपती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून टोमॅटो पीक घेतले.

Tomato bag poured into the field | टोमॅटोबाग शेतातच टाकली उपटून

टोमॅटोबाग शेतातच टाकली उपटून

googlenewsNext

पिंपरी पेंढार : चालू वर्षातील उन्हाळी हंगामात मुबलक पाण्याचा पुरवठा उपलब्ध असल्याने व गतवर्षी टोमॅटोला बाजारभाव मिळाल्याने याही वर्षी जुन्नर तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी लखपती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून टोमॅटो पीक घेतले. मात्र, बाजारभाव व मालाला उठाव नसल्याने पीक शेतातच फेकून देण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे.
द्राक्ष, डाळिंब, केळी, कांदा यानंतर जुन्नर तालुक्यातील सर्वात महत्त्वाचे पीक म्हणजे टोमॅटो आणि त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आशिया खंडातील नावाजलेली नारायणगाव येथिल टोमॅटोची बाजारपेठ. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार उन्हाळी हंगामात जुन्नर तालुक्यात सुमारे १० ते १२ हजार एकरांवर टोमॅटोची
लागवड होत असते आणि परंतु मागील १० वर्षाच्या लागवडीच्या आकडेवारीच्या तुलनेत यावर्षी ६० टक्के लागवडी कमी आहेत. या परिसरात साधारणपणे फेब्रुवारीपासून टोमाटो लागवडीचा हंगाम सुरू होतो ते थेट पावसाळ्यापर्यंत. परंतु उन्हाळी हंगामाच्या लागवडी एप्रिलच्या तिसºया आठवड्यापर्यंत समाप्त होतात.
खरा हंगाम सुरू होतो तो जूननंतर. मात्र काही शेतकºयांनी आघात लागवड करीत टोमॅटो पीक घेतले. मात्र बाजार भाव उठाव नसल्याने पीक फेकून देण्याची वेळ आली आहे.
या पिकासाठी नांगरणी, बांधणी, खत भरणी, ड्रीप, मल्चिंग पसरविणे, रोप लागवड, विविध औषध फवारणी, ड्रीपमधून खत सोडणे, पाणी सोडणे, सुतळी, काठी, डांब, तार, हा सर्व खर्च एकरी कमीतकमी दीड लाख रुपयांपर्यंत होतो. टोमॅटो पीक कमी दिवसांत जास्त नफा देऊन जाणारे असल्याने शेतकरी या पिकाकडे मोठ्या प्रमाणात वळला आहे. अतिशय मेहनत करून शेतकºयांनी चांगले पीक तयार केले परंतु बाजारभाव दीर्घकाळ मंदीत आल्याने शेतकºयाच्या हातात एकही
रुपया पडत नाही. अशा या मंदीच्या लाटेमध्ये सापडलेल्या शेतकºयाने उभ्या पिकात नांगर घातला आहे. जनावरे सोडली आहेत.
सतरा लाख
रुपयांचा तोटा
जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार येथील सावळेराम नानाभाऊ कुटे यांनी टोमॅटोच्या अकरा एकर बागा काढून टाकल्या आहेत.
टोमॅटोस प्रतिएकर दीड लाख रुपये खर्च याप्रमाणे सुमारे सतरा लाख रुपयांचा तोटा त्यांना या वेळी झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
सद्यस्थितीत नारायणगाव
येथील बाजारात आज ७० ते
८० रुपये प्रति २० किलोला बाजारभाव मिळत आहे. आतापर्यंत सुमारे १५००० ते १८००० क्रेट्स (२० किलो / क्रेट्स) टोमॅटो मार्केटमध्ये आवक झाली आहे, अशी माहिती टोमॅटो व्यापारी अमित दांगट यांनी दिली.हरियाना, पंजाब, राजस्थान, दिल्ली, कर्नाटक, तामिळनाडू या भागातून संपूर्ण देशात टोमॅटो पुरवठा होत असल्यामुळे आपल्या भागातील टोमाटोला मागणी नाही. यामुळे येथीळ व्यापाºयांना स्थानिक बाजारपेठेत विक्री करावी लागत आहे. त्यामुळे मालाला उठाव नाही. येणाºया २० ते २५ दिवसांत परराज्यातील टोमॅटो उत्पादनात घट होण्याची स्थिती असल्यामुळे टोमाटोचे बाजारभाव वाढण्याची चिन्हे आहेत.

Web Title: Tomato bag poured into the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.