देहूरोड येथे पिस्तुलाचा धाक दाखवत तरुणाला धमकाविले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 06:09 PM2018-09-29T18:09:55+5:302018-09-29T18:13:19+5:30

किवळे येथे तरुणाला पिस्तुलाचा धाक दाखवून धमकाविल्याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

Threatening to youth sawing feared of pistol at Dehu road | देहूरोड येथे पिस्तुलाचा धाक दाखवत तरुणाला धमकाविले 

देहूरोड येथे पिस्तुलाचा धाक दाखवत तरुणाला धमकाविले 

Next
ठळक मुद्देदहा हजार रुपयांची मागणी करीत जीवे मारण्याची धमकी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, पिस्तुल जप्त

पिंपरी : तरुणाला पिस्तुलाचा धाक दाखवून धमकाविल्याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना गुरुवारी किवळे येथील न्यु साई लॉज येथे घडली. अमित गजानन वानारे, आशिष किसन भटकर (दोघेही रा. किवळे, ता. हवेली. जि. पुणे) अशी आरोपींची नावे असून त्यांना पोलिसांनीअटक केली आहे. याप्रकरणी करण प्रकाश नायर (वय ३२, रा. दत्तवाडी, मारुंजी, ता. हवेली, जि.पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नायर हे यु साई लॉज येथे काम करत असताना आरोपी त्याठिकाणी आले. नायर यांना धमकावत, शिवीगाळ व दमदाटी करीत त्यांच्या डोक्याला पिस्तूल लावले. तसेच दहा हजार रुपयांची मागणी करीत जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून दोन्ही आरोपींना अटक करुन पोलिसांनी पिस्तुलही जप्त केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक मनोज पवार करत आहेत. 

Web Title: Threatening to youth sawing feared of pistol at Dehu road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.