पुणे-लोणावळा रेल्वे मार्गाच्या तिसऱ्या, चौथ्या टप्प्याचा आराखडा तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 01:46 AM2019-01-17T01:46:52+5:302019-01-17T01:47:07+5:30

लोहमार्ग : अंतिम मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठविणार, प्रवाशांची गैरसोय दूर होणार

The third, fourth stage plan of the Pune-Lonavla railway route is ready | पुणे-लोणावळा रेल्वे मार्गाच्या तिसऱ्या, चौथ्या टप्प्याचा आराखडा तयार

पुणे-लोणावळा रेल्वे मार्गाच्या तिसऱ्या, चौथ्या टप्प्याचा आराखडा तयार

Next

- मंगेश पांडे 


पिंपरी : पुणे-लोणावळा रेल्वे मार्गाची तिसरी आणि चौथी लाईन तयार करण्यात येणार असून, यासाठीचा सविस्तर प्रकल्प आराखडा(डीपीआर) मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनकडून तयार करण्यात आला आहे. हा अहवाल रेल्वे बोर्डाकडे अंतिम मंजुरीसाठी लवकरच पाठविण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. त्यामुळे रेल्वेच्या या नवीन लाईनच्या कामास गती मिळाल्याचे दिसून येत आहे.


पुणे-लोणावळा या ६३ किलोमीटर लांबीच्या लोहमार्गावर सध्या अप आणि डाऊन अशा दोन लाईन आहेत. यावरूनच लोकलसह एक्स्प्रेस व मालगाड्या धावतात. दरम्यान, रेल्वेगाड्यांची वाढती संख्या पाहता सध्याच्या दोन लाईन अपुºया पडतात. यासह अनेकदा मेंटनन्ससाठी लोहमार्ग बंद ठेवावा लागतो. यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. ही गैरसोय दूर करण्यासाठी मार्गावर आणखी दोन लाईन तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार प्रकल्पाचा डीपीआर तयार करण्यात आला आहे.


मेंटनन्सला मिळणार वेळ
सध्याच्या दोन लाईनवरून दिवसभरात धावणाºया गाड्यांचे एकूण प्रमाण पाहता आणखी नवीन दोन लाईन झाल्यास सध्याच्या दोन लाईनवरील ताण कमी होणार आहे. तसेच लोकलसाठी राखीव ठेवण्यात येणाºया दोन लाईन रात्री १ ते पहाटे ५ या वेळेत बंद ठेवून या वेळेत मेंटनन्स करता येऊ शकतो. दरम्यान, आता मेंटनन्स करायचा असल्यास अनेकदा दिवसाही लाईन बंद ठेवावी लागते. यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय टाळता येणार आहे.


जमिनीचे भूसंपादन करावे लागणार
डीपीआरला रेल्वे बोर्डाची मंजुरी मिळाल्यानंतर भूसंपादनासह पुढील इतर कार्यवाही सुरू होणार आहे. या नवीन लाईनसाठी आवश्यक असणाºया एकूण जमिनीपैकी ७० टक्के जमीन रेल्वेची आहे. तर ३० टक्के जमिनीचे भूसंपादन करावे लागणार आहे. दरम्यान, रेल्वेच्या मालकीच्या ७० टक्के जमिनीपैकी २० टक्के जमीन अतिक्रमित आहे.


मग, दहा मिनिटाला एक लोकल
४तिसरी आणि चौथी लाईन तयार झाल्यास लोकलची वारंवारिता वाढविण्यास मदत होणार आहे. चार लाईनपैकी दोन लाईन या लोकलसाठीच राखीव राहतील. तर इतर दोन लाईन एक्स्प्रेस व मालगाड्यांसाठी असतील. यामुळे लोकलची संख्या वाढविणेही शक्य
होणार आहे. सध्या साधारण ४० मिनिट अथवा १ तासाच्या अंतराने लोकल असते. मात्र, लाईनची संख्या वाढल्यास मुंबईप्रमाणे दर दहा मिनिटांनी लोकल सोडणे शक्य होणार आहे.

प्लॅटफार्म वाढविणे : अतिक्रमणाचा अडथळा
पुणे ते लोणावळादरम्यान, रोज प्रवास करणाºयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. नोकरीसह शिक्षण तसेच व्यवसायानिमित्त दररोज हजारो नागरिक पुणे ते लोणावळा ये-जा करीत असतात. लोकलमुळे ६३ किलोमीटरचे अंतर तातडीने कापले जात असल्याने तसेच वाहनांच्या तुलनेत लोकलचा प्रवासखर्चही कमी असल्याने अनेक जण लोकल प्रवासाला प्राधान्य देतात. नवीन लाईन झाल्यास प्रवाशांसाठी अधिक सोयीचे ठरणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून या लोहमार्गावरील अनेक ठिकाणची अतिक्रमणे हटविण्याचे काम सुरू आहे. तसेच अतिक्रमणे हटविल्यानंतर पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठीही काळजी घेतली जात आहे. यासह प्लॅटफार्मची रुंदीही वाढविली जात आहे.

Web Title: The third, fourth stage plan of the Pune-Lonavla railway route is ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.