नाट्य महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद, ‘लग्नाची बेडी’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ने जिंकले रसिकांचे मन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 02:25 AM2017-09-16T02:25:27+5:302017-09-16T02:25:39+5:30

लोकमत सखी मंच व नटराज कला-क्रीडा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने पॅन्टालून्स प्रस्तुत नाट्य महोत्सवाचे तिसरे पुष्प लग्नाची बेडी, तर चौथे पुष्प रायगडाला जेव्हा जाग येते या नाट्यप्रयोगाने गुंफले गेले.

The spontaneous response to the Natya Mahotsav, 'Lagaanachi Bedi', 'When Awakening Up Raigada' | नाट्य महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद, ‘लग्नाची बेडी’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ने जिंकले रसिकांचे मन

नाट्य महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद, ‘लग्नाची बेडी’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ने जिंकले रसिकांचे मन

Next

पिंपरी : लोकमत सखी मंच व नटराज कला-क्रीडा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने पॅन्टालून्स प्रस्तुत नाट्य महोत्सवाचे तिसरे पुष्प लग्नाची बेडी, तर चौथे पुष्प रायगडाला जेव्हा जाग येते या नाट्यप्रयोगाने गुंफले गेले.
१६ सप्टेंबरपर्यंत नाट्य महोत्सव आयोजित केला असून, बुधवारी लग्नाची बेडी, तर गुरूवारी रायगडाला जेव्हा जाग येते या नाट्यप्रयोगाला देखील प्रेक्षागृह तुडुंब भरले होते.
लग्नाची बेडी हा नाट्यप्रयोग सुरू होण्यापूर्वी स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. अविनाश देवरे, ज्येष्ठ समाजसेवक रमाकांत रोडे, संदीप जोशी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शशिकांत उपाध्ये यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच विजय जोशीनिर्मित रायगडाला जेव्हा जाग येते या नाट्यप्रयोगापूर्वी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ समाजसेवक दीपक पाटील, पीएफटी हॉलिडेजच्या संस्थापिका नीलम खेडलेकर, डॉ. संजीवकुमार पाटील यांचा, तर नाट्यप्रयोगातील कलाकारांचा देखील सत्कार करण्यात आला.
लग्नाची बेडी या नाट्यप्रयोगातील ज्येष्ठ कलाकार सुनील गोडबोले, विजय पटवर्धन, अशोक अवचट, संजय डोळे, अंकिता पनवेलकर, अक्षदा कुलकर्णी, मनोज देशपांडे यांनी आपल्या दमदार अभिनयाद्वारे प्रेक्षकांना हसवून खिळवत ठेवले.
उपेन्द्र दाते यांनी साकारलेली शिवाजीमहाराजांची भूमिका आणि स्वप्निल राजशेखर यांनी साकारलेली संभाजीराजे यांची, आनंद जोशी यांनी साकारलेली हंबीरराव आणि बालकलाकार ऋग्वेद शेंडे याने राजारामराजेची भूमिका अत्यंत ताकतीने साकारली.

...अन् प्रेक्षकांना ‘संभाजीराजे’ यांच्या निष्ठेचे दर्शन
रायगडाला जेव्हा जाग येते या ऐतिहासिक नाट्यप्रयोगालादेखील नागरिकांनी प्रेक्षागृह भरून गेले होते. या नाट्यप्रयोगात छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या राज्याभिषेकानंतरच्या काळात राजारामराजे यांना गादीवर बसविण्यासाठी प्रधानसेवक अण्णाजी व मोरोपंत यांनी शिवाजीराजे आणि शंभुराजे यांच्यात निर्माण केलेला गैरसमज, त्यामुळे घडणारे प्रसंग पूर्वार्धात दाखविण्यात आले. शेवटच्या क्षणी महाराजांनी राजारामराजे यांच्याशी केलेला संवाद जेव्हा संभाजीराजांना राजारामराजे सांगतात, तेव्हा प्रधानसेवक यांचा खोटेपणा समोर येतो आणि राजारामराजे यांचे संभाजीराजे यांच्याबदल असणारे प्रेम, निष्ठेचे दर्शन सर्वांना होते.

Web Title: The spontaneous response to the Natya Mahotsav, 'Lagaanachi Bedi', 'When Awakening Up Raigada'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे