मेट्रोचा डीपीआर येणार स्थायी पुढे 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 02:46 PM2018-12-10T14:46:53+5:302018-12-10T14:49:34+5:30

महापालिका निवडणूकीपूर्वी पहिल्या टप्यात स्वारगेट ते पिंपरी या मेट्रोला मंजूरी मिळाली.

Metro DPR will be present in pcmc | मेट्रोचा डीपीआर येणार स्थायी पुढे 

मेट्रोचा डीपीआर येणार स्थायी पुढे 

googlenewsNext
ठळक मुद्देनिगडी मेट्रोसाठी  १०४८ कोटींचा खर्च येणार चिचवड, आकुर्डी आणि निगडी हे तीन मेट्रोस्टेशन असणार.

पिंपरी : पिंपरी महापालिका भवन ते निगडी या दरम्यान उभारण्यात येणाऱ्या मेट्रो प्रकल्पासाठी एक हजार ४८ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. त्याचा विस्तृत प्रकल्प अहवाल अर्थात डिपीआर महामेट्रोने तयार करण्यात आला असून महापालिका स्थायी समिती समोर तो ठेवण्यात आला आहे. 
महापालिका निवडणूकीपूर्वी पहिल्या टप्यात स्वारगेट ते पिंपरी या मेट्रोला मंजूरी मिळाली. मात्र, पहिल्या टप्प्यातच ही मेट्रो निगडीपर्यंत नेण्याची मागणी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मनसे आदी राजकीय पक्षांनी केली होती. मात्र, त्यावर अधिक खर्च होणार असल्याने हा मार्ग लांबणीवर पडला होता. त्यानंतर महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या नेत्यांनी महामेट्रोला डिपीआर तयार करण्यास सांगितले. महामेट्रोने 'सिस्ट्रा' या आंतरराष्ट्रीय एजन्सीकडून हा डिपीआर तयार करून घेतला आणि महापालिकेकडे सादर केला. सप्टेंबर महिन्यातच तयार झालेला हा डीपीआर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आॅक्टोबरमध्ये सादर केला.
    महामेट्रो आणि सिस्टाच्या अधिकाºयांनी या बाबतच प्रेझेंटेशन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि अन्य अधिकाऱ्यांसमोरही केले आहे. हा डीपीआर स्थायी समिती सभेत मांडण्यासाठी मुहूर्त मिळाला आहे. स्थायी समितीतर्फे हा अहवाल महापालिका सभेत जाणार असून त्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारकडे तो सादर करण्यात येणार आहे. पिंपरी - चिंचवड महापालिका भवन ते निगडीपर्यंत ही मेट्रो जाणार असून या मार्गाचे एकुण अंतर ४.४१३ किलोमीटर असून मार्गावर चिंचवड, आकुर्डी आणि निगडी या तीन ठिकाणी मेट्रोस्टेशन असणार आहे. या प्रकल्पाच्या कामासाठी भूसंपादन करणे आणि सेवा वाहीन्यांचे स्थलांतर करणे आदी कामासाठी १०४८.२२ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. पहिल्या टप्यासाठी हजार कोटी खर्च अपेक्षीत आहे. 
...................................
महापालिका भवन ते निगडी अंतर ४.४१३ किलोमीटर.
चिचवड, आकुर्डी आणि निगडी हे तीन मेट्रोस्टेशन असणार.
प्रकल्पाच्या कामासाठी भूसंपादन करणे आणि सेवा वाहीन्यांचे स्थलांतरासाठी १०४८.२२ कोटी खर्च

Web Title: Metro DPR will be present in pcmc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.