सुटीच्या दिवशी रुग्णसेवा व्हेंटिलेटरवर, महापालिका, जिल्हा रुग्णालयातील परिस्थिती  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 04:15 AM2017-11-27T04:15:04+5:302017-11-27T04:15:11+5:30

शहरातील नागरिकांना वैद्यकीय सेवा देणे महापालिकेचे आद्य कर्तव्य. मात्र, रविवारी सुटीच्या दिवशीही महापालिका आणि जिल्हा रूग्णालयांमधील सेवा व्हेंटीलेटरवर असल्याचे लोकमत टीम ने केलेल्या स्टिंग आॅपरेशन आढळून आले.

 On the holidays, the condition of the patient services ventilator, municipal, district hospital | सुटीच्या दिवशी रुग्णसेवा व्हेंटिलेटरवर, महापालिका, जिल्हा रुग्णालयातील परिस्थिती  

सुटीच्या दिवशी रुग्णसेवा व्हेंटिलेटरवर, महापालिका, जिल्हा रुग्णालयातील परिस्थिती  

Next

पिंपरी : शहरातील नागरिकांना वैद्यकीय सेवा देणे महापालिकेचे आद्य कर्तव्य. मात्र, रविवारी सुटीच्या दिवशीही महापालिका आणि जिल्हा रूग्णालयांमधील सेवा व्हेंटीलेटरवर असल्याचे लोकमत टीम ने केलेल्या स्टिंग आॅपरेशन आढळून आले. जिल्हा शासकीय रुग्णालयातील शवविच्छेदन कक्षच बंद होता. एका निवासी डॉक्टरच्या भरवशावरच काम सुरू होते.

चिंचवड : तालेरातील सुरक्षा रामभरोसे
रुग्णालयाच्या दुसºया व तिसºया मजल्यावर काही महिला व पुरुष उपचारासाठी दाखल होते. येथील उपचारा बाबत त्यांच्या नातेवाईकांशी चर्चा केली असता. सुटीचा दिवस असूनही डॉक्टर तपासणीसाठी आल्याचे त्यांनी सांगितले.
जुनी सांगवी : रुग्णसेवा सुरू; कर्मचारी संख्या कमी
जुनी सांगवीतील शासकीय स्व. इंदिरा गांधी प्रसूती रुग्णालयात अत्यावश्यक रुग्णांसाठी सुविधा आणि व्यवस्था व्यवस्थित असल्याचे दिसून आले. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे व्यवस्था व केस पेपर व्यवस्था सुरू असल्याचे दिसून आले. रुग्णालयात दोन निवासी डॉक्टर, एक नर्स, एक आया, एक वार्डबॉय अशी व्यवस्था दिसून आली.

सांगवीतील जिल्हा रुग्णालयात तातडीची सेवा रामभरोसे

सांगवी : येथील औंध जिल्हा शासकीय रुग्णालयात एक निवासी डॉक्टर, दोन नर्स आणि एक शिपाई इतक्याच कर्मचाºयांच्या भरवशावर तातडीक विभागाचे कामकाज सुरू होते.
महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शासकीय रुग्णालय म्हणून ख्याती असलेले पुणे जिल्हा रुग्णालय औंध-सांगवी परिसरात असून, अनेक दुर्धर आजार आणि विशेषत: क्षयरोगावर इलाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून रुग्ण इथे येत असतात. मात्र, शासनाकडून दुर्लक्ष झालेले असून रुग्णालय आजारी असल्याचे दिसून आले.
मुख्य इमारतीसमोर असलेल्या पाण्याच्या नळाला तोट्या नाहीत. तर असलेल्या तोट्या नादुरूस्त तुटलेल्या दिसून येतात. यासह टाकीच्या जवळ स्वच्छतेचा अभाव आहे. परिसरात गाड्यांसाठी वेगळी पार्किंग असताना रुग्णालयात येणारे रुग्ण आणि नातेवाईक कोठेही वाहनांची पार्किंग करतात. सांडपाणी आणि ड्रेनेजमधून येणाºया घाण पाण्याचा निचरा होत नाही. अतिदक्षता विभाग प्रशिक्षण विभागाच्या समोर कचरा उघड्यावर टाकला जात असल्याचे दिसते. हा कचरा बाहेरील नाही, तर कर्मचारी वसाहतीतील रहिवासी आणि रुग्णालयांचा असल्याचे स्पष्ट होते.

संरक्षित भिंत असुरक्षित
रुग्णालय परिसरातील रस्ते आणि पथदिवे नादुरुस्त आणि खराब असल्याने परिसरात रात्री अंधार असतो. रुग्णालयाला संरक्षित भिंत नसल्याने कोठूनही प्रवेश असल्याचे दिसून येते. पुणे रुग्णालयाला लागलेली घरघर प्रशासनाने वेळीच दुरुस्त करून रुग्णांना सोयीसुविधा पुरवाव्यात, अशी नागरिकांची अपेक्षा आहे .

यमुनानगर : बाह्य रूग्ण विभाग बंद
१तळवडे : यमुनानगर येथील महापालिकेच्या रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग शनिवार अर्धा दिवस व रविवारी पूर्ण दिवस बंद असतो. मात्र रुग्णांच्या सोईसाठी अत्यावश्यक सेवा सुरू असते. परंतु अत्यावश्यक विभागात रुग्णांना हव्या त्या सुविधा पुरविल्या जात नसल्याचे रुग्णांच्या नातेवाइकांनी सांगितले.
२यमुनानगर येथील महापालिका रुग्णालयात केलेल्या पाहणीमध्ये बाह्यरुग्ण विभाग बंद, तर अत्यावश्यक सेवा सुरू असल्याचे आढळले. रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर महाराष्ट्र शासनाची १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका उभी असून, त्यामध्ये कर्मचारीही बसलेले होते. तर महापालिकेची रुग्णवाहिकासुद्धा तेथे उपलब्ध होती. रुग्णालयात रुग्णांना जेवण करण्यासाठी स्वतंत्र कक्ष उपलब्ध नसल्यामुळे रुग्ण कॉटवर बसूनच जेवण करत होते. रूग्णालयात सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरेल तसेच मोठी स्क्रीन बसविण्यासाठी हजारो रुपये खर्च केला आहे. परंतु ही यंत्रणाच बंद आहे.याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.

तालेरा : विविध विभाग बंद
चिंचवड : येथील तालेरा रुग्णालयाचे विस्तारीकरण करून नवीन इमारतीत स्थलांतरित केले आहे. या नवीन रुग्णालयाचे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय असे नामकरण झाले. सध्या या रुग्णालयात आरोग्यविषयक सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. आज सकाळपासूनच रुग्णालयात शांतता होती. मात्र तातडीक सेवा विभाग सुरू असल्याने येथे येणाºयांना वैद्यकीय सेवा सुरू होत्या.
रूग्णालयातील बहुतांश विभाग बंदच होते. सकाळी ११ला या ठिकाणी पाहणी केली असता, प्रवेशद्वाराच्या बाजूला असणारा तातडीक सेवा विभाग सुरू होता. चार रुग्ण या ठिकाणी बसले होते. येथे सेवा देण्यासाठी डॉक्टर व कर्मचारी उपलब्ध होते. येथे येणाºया रुग्णांची विचारपूस व तपासणी करून त्यांना उपचार दिले जात होते. या रुग्णालयात नेहमीच वर्दळ असते. तीन सुरक्षारक्षक तैनात होते मात्र संपूर्ण हॉस्पिटल फिरूनही कोणीही हटकले नाही.

दवाखाना रविवारी बंद, रुग्णांचे वाल्हेकरवाडीत होताहेत हाल

ंरावेत : वाल्हेकरवाडी, रावेत, चिंतामणी चौक गुरुद्वारा चौक आदी परिसरातील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी वाल्हेकरवाडी येथे पालिकेच्यावतीने दवाखाना सुरु केला आहे. रविवारी हा दवाखाना बंद असतो. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होते. शनिवारी दुपारनंतर बंद झाालेला दवाखाना सोमवारी सकाळीच उघडला जातो, असे येथील नागरिकांनी सांगितले. दवाखान्याची वेळ दर्शविणार साधा फलकदेखील येथे नाही. त्यामुळे रुग्ण व नातेवाईकांचा गोंधळ उडतो. रुग्ण येथे येऊन बंद अवस्थेतील दवाखाना पाहून परत फिरतात.
या दवाखान्याच्या परिसरात सर्वत्र कचºयाचे साम्राज्य पहावयास मिळाले. दवाखान्याच्या भिंतीस लागून दवाखाना आणि राहिवाश्यांच्या घरांना विद्युत पुरवठा करणारा डी पी आहे. ती उघड्या अवस्थेत असून खालची बाजू पूर्णपणे कुजलेली आहे. रूग्णांना आवश्यक असणाºया औषधांचा पुरवठा मात्र नियमितपणे मिळत असल्यामुळे रुग्णांची औषधांसाठी इतरत्र धावपळ करतात.

आरोग्य सेवेकडे दुर्लक्ष
कर्मचारी स्वत:च्या मनाप्रमाणे येतात व जातात त्यामुळे रुग्णांना अनेक वेळा ताटकळत उभे राहावे लागते. अल्पशा जागेमध्ये असणारे रुग्णालय त्यातच दुसरा मजला. त्यामुळे रुग्णांना जिना चढून जाने जिकरीचे होते. सध्या सर्दी खोकला थंडी ताप अशा स्वारुपाच्या रुग्णांची अधिक संख्या आहे.

संकलन : मंगेश पांडे, पराग कुंकुलोळ, अतुल क्षीरसागर,
संदीप सोनार, शशिकांत जाधव

Web Title:  On the holidays, the condition of the patient services ventilator, municipal, district hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.