‘सनबर्न’ला बावधन ग्रामस्थांचा विरोध; एकही गाडी जाऊ न देण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 12:41 PM2017-12-15T12:41:19+5:302017-12-15T12:47:30+5:30

आॅक्सफर्ड गोल्फ क्लब, मुळशी येथे होऊ घातलेल्या कथित ‘सनबर्न’ कार्यक्रमाला बावधन ग्रामस्थांनी कडाडून विरोध दर्शविला आहे.

bavdhan villagers opposes 'Sunburn' festival | ‘सनबर्न’ला बावधन ग्रामस्थांचा विरोध; एकही गाडी जाऊ न देण्याचा इशारा

‘सनबर्न’ला बावधन ग्रामस्थांचा विरोध; एकही गाडी जाऊ न देण्याचा इशारा

Next
ठळक मुद्देकार्यक्रमासाठी कुठलेही ना हरकत प्रमाणपत्र ग्रामपंचायतीने दिले नसताना होत आहे कार्यक्रमलवळे ते बावधन ग्रामपंचायतीदरम्यान बावधन हद्दीत २८ डिसेंबर ते ३१ डिसेंबरला आयोजन

वाकड : आॅक्सफर्ड गोल्फ क्लब, मुळशी येथे होऊ घातलेल्या कथित ‘सनबर्न’ कार्यक्रमाला बावधन ग्रामस्थांनी कडाडून विरोध दर्शविला आहे. या ‘सनबर्न’साठी एकही गाडी जाऊ न देण्याचा निर्धार करीत नगरसेवक किरण दगडे, सरपंच पीयुषा दगडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी, हिंजवडी पोलीस व मुळशी तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. 
मुळशी तालुक्यातील लवळे ते बावधन ग्रामपंचायतीदरम्यान डोंगरावरील बावधन हद्दीत २८ डिसेंबर ते ३१ डिसेंबर रोजी तीन दिवस गाणी व नृत्याच्या ‘सनबर्न’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. एका संकेतस्थळावर या कार्यक्रमाची तिकिटे विकली जात आहेत. मात्र हा सनबर्न फेस्टिव्हल पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात ते ही बावधन गावच्या हद्दीत होत असल्याने बावधनच्या सरपंच पीयुषा दगडे व इतर सदस्यांनी या कार्यक्रमाला तीव्र विरोध केला आहे. 
या कार्यक्रमासाठी कुठलेही ना हरकत प्रमाणपत्र ग्रामपंचायतीने दिले नसताना हा कार्यक्रम होत आहे. त्यामुळे या कार्यक्रमास परवानगी देऊ नये,  या आशयाचे पत्र हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण वायकर यांना दिले आहे. 
नगरसेवक किरण दगडे, बावधनच्या सरपंच पीयुषा दगडे, बावधन ग्रामपंचायत सदस्य सचिन बबनराव दगडे, आझाद दगडे, प्रदीप दगडे, सचिन शंकरराव दगडे, वैशाली दगडे, कल्पना घुले, शीतल दगडे यांनी गुरुवारी हिंजवडी पोलिसांना तसेच मुळशी तहसीलदार सचिन डोंगरे यांना पत्र देत या कार्यक्रमाला विरोध दर्शविला आहे. 
 

Web Title: bavdhan villagers opposes 'Sunburn' festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.