अजित पवार यांच्या हस्ते पै. अर्जुन काटे यांचा पिंपळे सौदागरमध्ये जीवनगौरव पुरस्काराने सन्मान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 12:04 PM2017-11-27T12:04:43+5:302017-11-27T12:11:13+5:30

एकसष्टाव्या राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवड शहरातील पैलवानांची निवड चाचणी स्पर्धा रविवारी घेण्यात आली. उद्घाटनाच्या पहिल्या कुस्तीत पै. धीरज बोऱ्हाडेने ५७ किलो माती गटात पै. अभिषेक कडूसकरला चितपट करुन विजय मिळविला.

Arjun Kate honors lifetime achievement award in Pimpale Saudagar by ajit pawar | अजित पवार यांच्या हस्ते पै. अर्जुन काटे यांचा पिंपळे सौदागरमध्ये जीवनगौरव पुरस्काराने सन्मान 

अजित पवार यांच्या हस्ते पै. अर्जुन काटे यांचा पिंपळे सौदागरमध्ये जीवनगौरव पुरस्काराने सन्मान 

googlenewsNext
ठळक मुद्दे१ वी राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दि. २० ते २४ डिसेंबरला होणार भूगाव येथेपै. दामुअण्णा काटे, पै. भरत कुंजीर यांचा अजित पवार यांच्या हस्ते विशेष सन्मान

रहाटणी : एकसष्टाव्या राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवड शहरातील पैलवानांची निवड चाचणी स्पर्धा रविवारी घेण्यात आली. उद्घाटनाच्या पहिल्या कुस्तीत पै. धीरज बोऱ्हाडेने ५७ किलो माती गटात पै. अभिषेक कडूसकरला चितपट करुन विजय मिळविला. ५७ किलो मॅटवरील उद्घाटनाच्या सामन्यात पै. कुणाल जाधवने पै. शुभम शिंदेला बांगडी डावावर चितपट करुन विजय मिळविला. ९७ किलो गटात मातीवर झालेल्या चित्तवेधक लढतीत पै. आदेश नाणेकरने पै. संकेत धाडगेला ६ विरुद्ध ० गुणांनी पराभूत करुन विजय मिळविला. 
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची ६१ वी राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दि. २० ते दि. २४ डिसेंबर २०१७ ला भूगाव (ता. मुळशी, जि. पुणे) येथे होणार आहे. त्यानिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील कुस्तीपटूंसाठी पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघ व नाना काटे सोशल फाऊंडेशन यांच्या वतीने कै. पंढरीनाथ फेंगसे यांचे स्मरणार्थ पिंपळे सौदागर पोलीस चौकी शेजारी कै. देवराम काटे पाटील क्रीडानगरीत रविवारी निवड चाचणी कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाच्या वतीने पिंपळे सौदागर येथील वस्ताद पै. अर्जुन दत्तोबा काटे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच पै. दामुअण्णा काटे व पै. भरत कुंजीर यांना नाना काटे सोशल फाउंडेशनच्या वतीने अजित पवार यांच्या हस्ते विशेष सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 


 यावेळी खासदार श्रीरंग बारणे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे, संयोजक व नगरसेवक विठ्ठल काटे, संघाचे उपाध्यक्ष काळूराम कवीतके, संतोष माचुत्रे, खजिनदार दिलीप बालवडकर, सचिव धोंडीबा लांडगे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते शंकर काटे, आॅलिम्पिक वीर मारुती आडकर, अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष विजय बराटे, भारत केसरी विजय गावडे, हिंद केसरी अमोल बराटे, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, अतुल शितोळे, कैलास थोपटे, हरीभाऊ तिकोणे, सुनिल कुंजीर आदींसह कुस्ती शौकीन उपस्थित होते.

Web Title: Arjun Kate honors lifetime achievement award in Pimpale Saudagar by ajit pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.