WWE Superstar पेयटन रॉयसचे 'टॉपलेस' फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2020 04:51 PM2020-02-16T16:51:29+5:302020-02-16T16:55:12+5:30

WWEच्या रिंगमध्ये कधी काय घडेल याचा अंदाज कोणीच बांधू शकत नाही. WWEच्या रिंगमध्ये आपल्या दमदार खेळीनं प्रतिस्पर्धींना चीतपट करणाऱ्या पेयटन रॉयस या महिला कुस्तीपटूची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.

27वर्षीय रॉयसनं नुकतंच सोशल मीडियावर तिचा टॉपलेस फोटो शेअर केला. तिचा हा फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला. नेटिझन्सने तर त्याच्यावर लाईक्सचा पाऊस पाडला.

तासाभरात तिच्या फोटोला 1 लाख 65 हजार लाईक्स मिळाले. तिची सहकारी बिली के हीनंही या फोटोवर गमतीशीर कमेंट लिहीली.

फेब्रुवारी 2009मध्ये रॉयसने व्यावसायिक कुस्ती स्पर्धेत पदार्पण केले. स्तनाच्या कर्करोगासाठी झालेल्या सामन्यात ती रिंगमध्ये उतरली होती.

ऑगस्ट 2019मध्ये रॉयसनं पुरुष कुस्तीपटू शॉन स्पीअर्सशी विवाह केला.