स्ट्रेस फ्री हॉलिडे ट्रिपसाठी 'या' टिप्स करा फॉलो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2019 03:46 PM2019-06-06T15:46:57+5:302019-06-06T15:51:12+5:30

रोजच्या कामातून विश्रांती मिळावी म्हणून सुट्टी घेतली जाते. मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अनेकजण ट्रिपचं आयोजन करतात. मात्र सुट्टीचा मनमुराद आनंद लुटाण्यासाठी तसेच स्ट्रेस फ्री हॉलिडेसाठी 'या' टीप्स करा नक्की फॉलो करा.

सहलीसाठी योग्य ठिकाणाची निवड करा. त्या ठिकाणचे वातावरण, राहायची सोय आणि पर्यटन स्थळं याची माहिती घ्या.

फिरायला गेल्यावर खरेदी देखील केली जाते. तसेच त्या ठिकाणच्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येतो. विविध ठिकाणांना भेट देता येते. मात्र यासाठी पैशाची आवश्यकता असते. त्यामुळे पैशाचं योग्य नियोजन करा.

प्रवासादरम्यान अनेकदा आजारी पडण्याचा धोका असतो. त्यामुळे काही औषध नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्याने तुमच्यासोबत ठेवा. तसेच खाण्यासाठी सुका खाऊ आणि पौष्टिक पदार्थ बॅगेत ठेवा.

सहलीच्या आठवणी जशा आपण मनात साठवतो तसेच ते क्षण फोटोंच्या स्वरूपात ही जपून ठेवता येतात. त्यामुळे कॅमेरा सोबत ठेवा आणि सुंदर ठिकाणांसोबत तुमचे फोटो काढा.

हॉलिडे ट्रिपसाठी अनेकजण सोशल मीडियाचा अधिक वापर करतात. त्यामुळे असं न करता मिळालेला मोकळा वेळ हा स्वत: साठी वापरा. तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींसाठी वेळ खर्च करा.