Nokia G11 Plus: Nokiaचा दिवाळी धमाका! 50MP कॅमेरा अन् 3 दिवसांचा बॅटरी बॅकअप; जाणून घ्या फीचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 06:40 PM2022-10-11T18:40:15+5:302022-10-11T18:44:22+5:30

Nokia G11 Plus नोकियाने भारतात एक स्वस्त अँड्रॉइड स्मार्टफोन लॉन्च केला असून, किंमत 13 हजारांपेक्षा कमी आहे.

Nokia G11 Plus: अनेक दशके लोकांच्या मनावर आधिराज्य गाजवणाऱ्या नोकियाने भारतात त्यांचा नवीन मोबाईल लॉन्च केला आहे. Nokia G11 Plus असे या मोबाईलचे नाव असून, कंपनीने या फोनला ब्लोटवेअर-फ्री Android एक्सपीरिएंससह बाजारात आणले आहे. HMD Global ने या स्वस्त फोनला जून महिन्यात ग्लोबल मार्केटमध्ये सादर केले होते. कंपनीने दावा केलाय की, या फोनची बॅटरी तब्बल तीन दिवस चालेल.

किंमत किती आहे- Nokia G11 Plus ला सिंगल 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज ऑप्शनसह बाजारात आणले आहे. नोकिया इंडियाच्या साइटनुसार, या मोबाईलची किंमत 12,499 रुपये आहे. हा फोन Charcoal Grey आणि Lake Blue कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. कंपनी लवकरच या स्वस्त फोनला लीडिंग रिटेल आणि ऑनलाइन स्टोर्सवर उपलब्ध करणार आहे.

फोनचे स्पेसिफिकेशन्स- Nokia G11 Plus मध्ये 6.5-इंच HD+ स्क्रीन 90Hz रिफ्रेश रेट असेल. तसेच, यात Unisoc T606 प्रोसेसर दिले आहे. हा फोन 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजसह येईळ. याचे स्टोरेज microSD कार्डच्या मदतीने 512GB पर्यंत वाढवता येईल. हा फोन ब्लोटवेअर-फ्री अँड्रॉइड 12 वर बेस्ड आहे. हा फोन दोन वर्षांचे OS अपग्रेड आणि तीन वर्षापर्यंत मंथली सिक्योरिटी अपडेट्ससह येईल. यात फेस अनलॉक आणि रिअर फिंगरप्रिंट सेंसर आहे. तसेच, वॉटर रेजिस्टेंटसाठी IP52 रेटिंग दिली आहे.

कॅमेरा फीचर्सच- फोटोग्राफीसाठी यात रिअरमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 50-मेगापिक्सलचा असेल. यासोबतच 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर कॅमेरा असेल. फोनच्या फ्रंटमध्ये सेल्फीसाठी 8-मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. कंपनीने दावा केलाय की, याची बॅटरी सिंगल चार्जवर 3 दिवसापर्यंच चालेल. हा फोन 10W चार्जिंग सपोर्टसह येतो. हा फोन USB Type-C पोर्टने चार्ज करता येईल. तसेच, यात एक 3.5mm हेडफोन जॅक असेल.