तेंडुलकरांच्या लेकीचा साजच न्यारा, बाप्पाच्या उत्सवासाठी नटली-सजली मराठमोळी सारा... (Photos)

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 01:48 PM2023-09-21T13:48:19+5:302023-09-21T14:32:59+5:30

या प्रकाराला 'द अबशर साडी' असं नाव असून, याची किंमत तब्बल...

Sara Tendulkar Traditional Look, Ganesh Mahotsav 2023: महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर कायमच तिच्या लूक्स मुळे चर्चेत असते.

सध्या राज्यभरात गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. यासाठी सारानेही खास पारंपरिक लूक केल्याचे दिसून आले.

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरी गणेशोत्सवासाठी साराने ही साडी परिधान केली होती.

साराने आपल्या सौंदर्याने साऱ्यांना आधीच मोहिनी घातली आहे. त्यात आता तिच्या नव्या लूकने साऱ्यांनाच भुरळ पाडली आहे.

सारा तेंडुलकरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ट्रेडिशनल लूक शेअर केला आहे. तेंडुलकरांच्या लाडक्या लेकीने पिवळ्या रंगाची अतिशय सुंदर अशी डिझायनर साडी नेसली आहे.

साराने परिधान केलेल्या साडीचा पॅटर्न अतिशय रेखीव असून ही गोपी वैद डिझाइन्स यांनी डिझाइन केलेली साडी आहे.

साडीतील पारंपरिक मराठमोळा लूक आणि केसात गजरा असा अप्रतिम पारंपरिक लूक साराला खूपच सुंदर दिसतो आहे.

कानात एथनिक लूकला मॅचिंग झुमके, गळ्यात नेकलेस आणि ओठांवर स्मितहास्य असलेले साराचे सगळे फोटो तिच्या चाहत्यांना भावले आहेत.

साराने नेसलेली साडी ही शिफॉन आणि टसर सिल्करच्या कॉम्बिनेशनमधून बनवण्यात आली आहे. या प्रकाराला द अबशर साडी (the Abshar Saree) म्हणतात.

गोपी वैद यांच्या वेबसाईटनुसार, साराच्या या अबशर डिझायनर साडीची किंमत तब्बल ४८,५०० रूपये इतकी आहे.