Punjab Elections 2022 : सिद्धू यांच्या पराभवानंतर अर्चना पूरन सिंहच्या खुर्चीला धोका, व्हायरल झाले मजेदार मीम्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 04:47 PM2022-03-10T16:47:47+5:302022-03-10T16:54:11+5:30

Navjot Singh Sidhu - Archana Puran Singh : पंजाबच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला आणि कॉंग्रेसचे उमेदवार नवजोत सिंह सिद्धू हे निवडणुकीत पराभूत झालेत. अशात आता सिद्धू हे निवडणूक हरले त्यामुळे सोशल मीडियावर दोघांवरील मीम्स व्हायरल झाले आहेत.

पंजाबच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला आणि कॉंग्रेसचे उमेदवार नवजोत सिंह सिद्धू हे निवडणुकीत पराभूत झालेत. ते कॉंग्रेसमध्ये जाण्याआधी कॉमेडिअन कपिल शर्माच्या शोमध्ये दिसले होते. अर्चना आता सिद्धू यांच्या जागी शोची रौनक वाढवते. जेव्हापासून अर्चनाने शोमधील जजची खुर्ची मिळवली तेव्हापासून कपिल शर्मा आणि तिचे फॅन्स तिला सिद्धू यांच्या नावाने चिडवत असते. अशात आता सिद्धू हे निवडणूक हरले त्यामुळे सोशल मीडियावर दोघांवरील मीम्स व्हायरल झाले आहेत.

नवजोत सिंह सिद्धू यांनी पंजाबचे मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पाहिलं होतं. पण ते स्वप्न आता पूर्ण होऊ शकत नाही. पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने बहुमत मिळवलं. पंजाबममध्ये कॉंग्रेसचे मुख्यमंत्रीही निवडणूक हरले. सोबतच सिद्घू हेही हरले. अशात आता अर्चना आणि सिद्धू यांच्यावरून मजेदार मीम्स व्हायरल झाले आहेत.

ट्विटर यूजर्स म्हणत आहेत की, अर्चना पूरन सिंहसाठी हा कठिण आणि त्रासदायक काळ आहे. कारण आता तिची कपिल शर्मा शोमधील खुर्ची हिसकावली जाणार आहे. यूजर्स म्हणाले की, सिद्धू निवडणूक हरल्याने द कपिल शर्मा शोमध्ये पुन्हा परत येणार आहेत. त्यांचं राजकीय करिअर संपलं आहे.

नवजोत सिंह सिद्धू कपिल शर्माचा शो कॉमेडी नाइट्स विथ कपिल आणि द कपिल शर्मा शोमध्ये जज होते. सिद्धू या शोमध्ये आपल्या शायरीसाठी आणि जोक्ससाठी ओळखले जातात. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी शो सोडला होता. त्यानंतर त्यांच्या जागी अर्चना पूरन सिंह आली होती.