खेळाच्या मैदानातील स्वप्नसुंदरी... कोण आहे ही तरूणी, जिच्या फोटोंची रंगलीय तुफान चर्चा (Photos)

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 06:49 PM2024-01-16T18:49:59+5:302024-01-16T19:08:22+5:30

ही स्पॅनिश खेळाडू फिटनेसच्या बाबतीतही आहे आग्रही

Aitana Bonmatí Conca Hot & Bold Photos: स्पॅनिश फुटबॉलपटू एटाना बोनमाटी हिला यंदाचा फिफा महिला सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला.

२०२३ या वर्षातील तिच्या दमदार कामगिरीसाठी तिचा हा गौरव करण्यात आला. एटानासाठी २०२३ हे वर्ष एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नव्हते. तिने अनेक जेतेपदे पटकावली.

स्टार खेळाडू असण्यासोबतच एटाना सौंदर्याच्या बाबतीतही अजिबात कमी नाही. जाणून घेऊया तिच्याबद्दल काही रंजक गोष्टी-

एटाना बोनमाटीने २०२३ साली स्पेनकडून खेळताना संघाला विश्वचषक जिंकून दिला. तिने बार्सिलोनाकडून खेळताना UEFA चॅम्पियन्स लीगचे विजेतेपदही पटकावले.

अवघ्या २५ वर्षांची असलेल्या एटानाने बॅलन डी'ओर, प्लेअर ऑफ द वर्ल्ड कप आणि यूईएफए प्लेयर ऑफ द इयर हे पुरस्कारही जिंकले.

आता तिने 2023 चा फिफा सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूचा पुरस्कारही जिंकला. एटाना बोनमाटी जितकी जबरदस्त खेळाडू आहे, तितकीच ती सुंदरही आहे.

तिचे हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. बार्सिलोना आणि स्पेनची खेळाडू असलेली एटाना बोनमाटी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

एटाना रोज काही ना काही फोटो किंवा व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिचे सोशल मीडियावर तब्बल १.५० मिलियन फॉलोअर्स आहेत.