यंदाची FIFA विश्वचषक स्पर्धा गाजवणारे आतापर्यंतचे विक्रमवीर !

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 03:09 PM2022-12-01T15:09:18+5:302022-12-01T15:19:45+5:30

फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा थरार सुरू असताना आतापर्यंत अनेक विक्रमांची नोंद झाली. यामध्ये अर्थातच ख्रिस्तियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी या दिग्गजांनी सर्वांचे लक्ष वेधले.

फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा थरार सुरू असताना आतापर्यंत अनेक विक्रमांची नोंद झाली. यामध्ये अर्थातच ख्रिस्तियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी या दिग्गजांनी सर्वांचे लक्ष वेधले.

खेळाडूंनी शानदार कामगिरीच्या जोरावर विक्रमी कामगिरी करत सर्वांना आपली मात्र, इतरही दखल घेण्यास भाग पाडले. सर्वाधिक गोल, सर्वाधिक यलो-रेड कार्ड, सलग सामन्यांमध्ये गोल, गोल करणारे युवा-वरिष्ठ खेळाडू अशा विविध विक्रमी कामगिरींचा घेतलेला आढावा.

लिओनेल मेस्सी अर्जेटिना मेस्सी चार विश्वचषक स्पर्धांमध्ये (२००६, २०१४, २०१८ आणि २०२२) गोल करणारा पहिला अर्जेंटेनियन फुटबॉलपटू ठरला. असा पराक्रम करताना त्याने दिएगो मॅराडोना (१९८२, १९८६, १९९४) आणि गॅब्रिएल बटिस्टुटा (१९९४, १९९८, २०२२) यांची कामगिरी मागे टाकली.

ख्रिस्तियानो रोनाल्डो पोर्तुगाल रोनाल्डो जगातील पहिला फुटबॉलपटू ठरला, ज्याने सलग पाच विश्वचषक स्पर्धांमध्ये गोल केला. रोनाल्डोने २००६, २०१०, २०१४, २०१८ आणि २०२२ अशा सलग पाच विश्वचषक स्पर्धांमध्ये गोल केले आहेत.

गावी स्पेन कोस्टा रिकाविरुद्ध स्पेनने मिळवलेल्या ७-० अशा विजयात १८ वर्षीय गावीने एक गोल केला. यासह तो विश्वचषक स्पर्धेत गोल करणारा स्पेनचा सर्वात युवा आणि फुटबॉलविश्वातील केवळ तिसरा युवा खेळाडू ठरला. विश्वचषकात गोल करणारे सर्वात युवा फुटबॉलपटूंमध्ये ब्राझीलचे दिग्गज पेले (१७ वर्षे २३९) आणि मेक्सिकोचे मॅन्युएल रोसास (१८ वर्षे ९९ दिवस) यांचा समावेश आहे.

ऑलिव्हर गिरोड फ्रान्स पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळवलेल्या ४-१ विजयामध्ये ३६ वर्षीय स्टार ऑलिव्हर गिरोडने दोन गोल केले. यासह त्याने फ्रान्सकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करण्याच्या दिग्गज थिएरी हेन्रीच्या ५१ गोलच्या विक्रमाशी बरोबरी केली. विशेष म्हणजे यासह त्याने पोर्तुगालकडून विश्वचषक स्पर्धेत गोल करणारा सर्वात युवा आणि वयस्क खेळाडू असे दोन्ही विक्रमही आपल्या नावावर नोंदवले.

वेन हेनेसी वेल्स इराण विरुद्धच्या लढतीत वेल्सचा गोलरक्षक वेन हेनेसी याला रेड कार्डला सामोरे जावे लागल्याने मैदान सोडावे लागले. विशेष म्हणजे फुटबॉल विश्वचषकात रेड कार्डला सामोरा गेलेला हेनेसी हा केवळ तिसरा गोलरक्षक ठरला.