कबड्डी फायनलमध्ये भारत-इराणच्या खेळाडूंमध्ये राडा! रेफरीं झाले सैरभैर; जाणून घ्या नेमकं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2023 02:50 PM2023-10-07T14:50:05+5:302023-10-07T14:52:49+5:30

Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत २०२३ पुरुषांच्या कबड्डी फायनलमध्ये ड्रामा पाहायला मिळाला. गतविजेता इराण आणि भारत यांच्यातल्या या सामन्यात एका निकालाने रेफरींचा ताप वाढवला अन् दोन्ही संघ मैदानावर ठिय्या मारून बसले.

भारताने पहिल्या हाफमध्ये १५-१० अशी आघाडी घेतली होती, परंतु इराणने दुसऱ्या हाफमध्ये चांगला खेळ केला. ११ गुण, दोन बोनस गुण व १ लोणचे गुण घेत त्यांनी सामना २८-२८ असा बरोबरीत आणला होता.

कबड्डीच्या फायनलमध्ये ड्रामा पाहायला मिळाला. गतविजेता इराण आणि भारत यांच्यात कबड्डीची अंतिम लढतीत शेवटच्या १.०५ मिनिटाच्या खेळाच्याआधी २८-२८ अशी बरोबरी होती. पवनने चढाई केली आणि त्याला पकडण्यासाठी इराणचे बचावपटू सरसावले. त्यांनी पवना कोर्ट बाहेर फेकले, परंतु त्याचवेळी इराणचे ४ खेळाडूही बाहेर गेले.

नियमानुसार भारताला ४ गुण मिळायला हवे होते, परंतु रेफरीने तसं केले नाही. अनेकदा रिप्ले पाहूनही रेफरींनी १-१ असा गुण दिला. नंतर रेफरींनी पुन्हा निर्णय बदलला आणि भारताच्या बाजूने ४-१ असे गुण दिले गेले.

इराणच्या खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आणि पुन्हा रेफरींनी १-१ असा गुण दिला. त्याचा निशेष म्हणून भारतीय खेळाडू कोर्टवर ठिय्या मांडून बसले.

रेफरींमध्येच गोंधळ पाहायला मिळाला आणि त्यांनी जवळपास ३ वेळा हा निर्णय बदलला. अखेर भारताला ३ आणि इराणला १ गुण दिला गेला आणि सामन्यात भारताने ३१-२९ अशी आघाडी घेतली.

भारताने ६५ सेकंदाच्या खेळात ३३-२९ अशी बाजी मारून सुवर्णपदक नावावर केले