Traffic Rules: ट्रॅफिक पोलिसांनी अडवले तुम्ही काय करू शकता? जाणून घ्या तुमचे चार महत्त्वपूर्ण अधिकार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 04:41 PM2023-01-04T16:41:34+5:302023-01-04T16:43:49+5:30

Traffic Rules: रस्ते प्रवासातील दुर्घटना टाळण्यासाठी सरकारकडून वाहन चालवण्याबाबत अनेक नियम बनवण्यात आलेले आहेत. या नियमांना ट्रॅफिक रुल्सच्या नावाने ओळखले जाते. या नियमांचे पालन करणे आवश्यक असते. तसे न केल्यास पोलीस तुमच्यावर दंडात्मक कारवाई करू शकतात.

रस्ते प्रवासातील दुर्घटना टाळण्यासाठी सरकारकडून वाहन चालवण्याबाबत अनेक नियम बनवण्यात आलेले आहेत. या नियमांना ट्रॅफिक रुल्सच्या नावाने ओळखले जाते. या नियमांचे पालन करणे आवश्यक असते. तसे न केल्यास पोलीस तुमच्यावर दंडात्मक कारवाई करू शकतात.

वाहतूक पोलीस रस्त्यावरून जाणाऱ्या कुठल्याही वाहनाला तपासणीसाठी थांबवू शकतात, तसेच त्या वाहनाची कागदपत्रे मागू शकतात. असे झाल्यास ड्रायव्हरने कागदपत्रे दाखवणे आवश्यक असते. यादरम्यान, पोलीस कर्मचाऱ्यांकडून गैरवर्तन झाल्याच्या घटना समोर येत असतात. त्यामुळे वाहन मालकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असतो. जर तुमच्यासोबतही अशी घटना घडली तर तुम्हीही तुमच्या अधिकारांचा वापर करू शकता. हे अधिकार पुढीलप्रमाणे.

रस्त्यावर वाहन चालवताना जर ट्रॅफिक पोलिसांनी तुम्हाला अडवून गाडीची कागदपत्रे दाखवण्यास सांगितले तर तुम्ही संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला त्याचे अधिकृत ओखळपत्र दाखवण्यास सांगू शकता. तुम्ही संबंधित पोलीस कर्मचाऱ्याच्या युनिफॉर्मवर लिलिहेला नंबरसुद्धा नोंदवून घेऊ शकता.

मोटार वाहन कायद्यानुसार जर कुठल्याही पोलीस कर्मचाऱ्याने तुमच्याकडे कागदपत्रांची मागणी केली. तर तुम्ही ती कागदपत्रे त्यांना दाखवू शकता. मात्र तुम्हाला वाटल्यास तुम्ही ती कागदपत्रे पोलिसांना देण्यास नकार देऊ शकता. त्याशिवाय तुम्ही पोलिसांना डिजिटल कागदपत्रेही दाखवू शकता. पोलीस डिजिटल कागदपत्रे नाकारू शकत नाहीत.

मोटार वाहन कायद्यानुसार जर ट्रॅफिक पोलिसांनी तुमच्या वाहनाची कुठलीही कागदपत्रे किंवा वाहन जप्त केले तर तुम्ही जप्त केलेल्या वस्तूची पावती मागू शकता. हे काम विनम्रतापूर्णपणे करू शकता. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान तुम्ही पोलिसांसोबत गैरवर्तन करू शकत नाही.

जर तुम्ही चार चाकी वाहनात असाल तर पोलीस तुम्हाला कागदपत्रे दाखवण्यासाठी वाहनातून खाली उतरण्यास सांगू शकत नाही. जर तपासणीदरम्यान पोलिसांचं वर्तन चांगलं नसेल तर तुम्ही याची तक्रार वरिष्ठ अधिकारी किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात करू शकता.