या आहेत भारतातील अद्भूत लेण्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2018 05:32 PM2018-08-06T17:32:49+5:302018-08-06T17:52:35+5:30

भारतातील विविध ठिकाणी मानवी मनाला थक्क करणारा प्राचीन ठेवा अस्तित्वात आहे. त्या ठेव्यापैकीच एक भाग म्हणजे आपल्या पूर्वजांनी दगडांमध्ये खोदलेल्या लेण्या. भारतात विविध ठिकाणी अशा लेण्या अस्तित्वात आहेत.

उदयगिरी लेण्या (ओदिशा) - ओदिशाची राजधानी असलेल्या भुवनेश्वरपासून जवळच उदयगिरीच्या लेण्या आहेत. 33 पर्वतांना खोदून या लेण्या तयार करण्यात आल्या आहेत. अज्ञातवासादरम्यान पांडवांनी इथेच वास्तव्य केल्याचे सांगितले जाते.

महाबलीपुरम वराह लेण्या - महाबलीपुरम वराह लेण्याही प्राचीन आणि प्रेक्षणीय आहेत. या लेण्या पाहण्यासाठी देश-विदेशातून लोक येत असतात.

भीमबेटका लेण्या - भीमबेटका लेण्या मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील रतापाणी अभयारण्यात आहेत. या लेण्या 30 हजार वर्षे जुन्या असल्याचे सांगितले जाते.

बाराबर लेण्या - बिहारमधील बाराबर लेण्याही प्राचीन आहेत. मौर्यकाळामध्ये या लेण्यांची निर्मिती झाली होती.

बदामी लेण्या - कर्नाटकमधील बदामीच्या लेण्या जगप्रसिद्ध आहेत. तसेच येथील बदामी मंदिरही प्रसिद्ध आहे.

एलिफंटा - महाराष्ट्रातील एलिफंटा बेटांवर असलेल्या एलिफंटा लेण्या प्रसिध्द आहेत. येथे एकूण सात लेण्या आहेत.

अजिंठा आणि वेरुळच्या लेण्या - अजिंठा आणि वेरुळच्या लेण्या औरंगाबाद जिल्ह्यात आहेत. या लेण्यांमध्ये हिंदू आणि बौद्ध लेण्यांचा समावेश आहे.