चेन्नईसह तामिळनाडूत पावसाचा धुमाकूळ....

By admin | Published: December 2, 2015 12:00 AM2015-12-02T00:00:00+5:302015-12-02T00:00:00+5:30

इमारतीमध्ये पुराचे पाणी घुसले अडकलेल्या नागरीकांच्या सुटकेसाठी बोटी बोलवल्या

चेन्नईतील उपनगर तंबाराममध्ये सर्वाधिक ४९ मिमी पाऊस

राज्य आपत्ती मदत निधीतून तामिळनाडूला ५०९ कोटी मंजूर केल्याची केंद्रीय गृहमंत्रालयाची माहिती.

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्टयामुळे तामिळनाडूमध्ये पुढचे २४ तास पावसाची संततधार कायम रहाणार. पुडूचेरीमध्ये मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज.

समुद्र किनाऱ्यावरील शांतता सर्व काही सांगून जाते

अनेक धरणांच्या पाणीसाठ्यानेही आता धोक्याची पातळी ओलांडल्याने पूरस्थितीत वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पुराच्या पाण्याचा फटका आता चेन्नई विमानतळालाही बसला आहे. रन वेवर पाणी आल्याने विमानतळावरील सर्व उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत.

16 नोव्हेंबरपासून शाळा बंद असून सहामाही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

महिन्याभरापूर्वी आलेल्या रोआनू वादळानंतर चेन्नईत पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर सतत पडत असणाऱ्या पावसाने चेन्नईचे जनजीवन ठप्प झालं आहे. किनाऱ्यालगत असलेल्या सर्व भागात सध्या पुराच्या पाण्याचं साम्राज्य पसरलेलं आहे.

रुळावर पाणी आल्याने रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. तर रस्त्यावरही पाणी साचलं आहे. काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्याचंही समोर आलं आहे.

मदतीसाठी लष्कर नौदलाच्या जवानांना पाचारण करण्यात आलं असून एनडीआरएफची दहा पथकांचं बचावकार्यही युद्धपातळीवर सुरु आहे.

तामिळनाडूत पावसाने धुमाकूळ घातला आहे. मागील महिन्याभरापासून सुरु असलेल्या पावसाने चेन्नईसह राज्यात आतापर्यंत १८९ जणांचा बळी घेतला आहे. तेथिल काही क्षणचित्रे आम्ही येथे देत आहोत पाहण्यासाठी पुढील स्लाईड क्लिक करा....