West Bengal Election 2021: ममतांच्या हल्ल्यांना मोदींचं 'चुन-चुन के' उत्तर; भरसभेत वाचला दीदींनी दिलेल्या 'शिव्यां'चा पाढा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 05:01 PM2021-04-17T17:01:40+5:302021-04-17T17:16:25+5:30

पश्चिम बंगालमध्ये एकीकडे पाचव्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. तर दुसरीकडे सहाव्या टप्प्यासाठी निवडणूक प्रचारही सुरू आहे. बंगालमध्ये सहाव्या टप्प्यात भाजपचा विजय निश्चित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभांचा धडाका सुरू केला आहे. (PM Narendra Modi counted from rally mamata banerjee said abusive words to them)

पश्चिम बंगालमध्ये एकीकडे पाचव्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. तर दुसरीकडे सहाव्या टप्प्यासाठी निवडणूक प्रचारही सुरू आहे. बंगालमध्ये सहाव्या टप्प्यात भाजपचा विजय निश्चित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभांचा धडाका सुरू केला आहे.

पंतप्रधा मोदींनी शनिवारी पश्चिम बंगालमधील दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यातील गंगारामपूर येथे रेली केली. यावेळी मोदी म्हणाले, ममतांनी दिलेल्या शिव्यांमुळे (अपशब्दांमुळे) मला काही फरक पडत नाही. दीदी, आपल्याला मला जेवढे काही शिव्या-शाप द्यायचे असतील द्या, पण किमान बंगालची संस्कृतीतरी विसरू नका. देशातील लोक, बंगालचा समृद्ध वारसा, येथील लोकांची वाणी आणि वर्तनावर गर्व करतात.

'19 मार्चला दीदी म्हणाल्या...' पंततप्रधान मोदी म्हणाले, 19 मार्चला दीदी म्हणाल्या, 'त्यांची मोदींचा चेहरा बघण्याची इच्छा नाही. नंतर दीदींनी देशाच्या पंतप्रधानांची तुलना लुटारू, देंगेखोर, दुर्योधन, दुशासनासोबत केली. 20 मार्चला दीदी मला लेबर किलर म्हणाल्या, दंगा करनाराही म्हणाल्या.'

'26 मार्चला दिली म्हणाल्या...' मोदी म्हणाले, 26 मार्चला दीदी म्हणाल्या, ' देशात केवळ मोदींची दाढीच वाढत चालली आहे. मोदींच्या डोक्याची काही गडबड आहे. असे वाटते, की मोदींचा स्क्रू ढिला आहे. 4 एप्रिलला दीदी, बंगालमध्ये भाजपचे सरकार येईल म्हणून भडकल्या. त्या म्हणाल्या, मी काय देव आहे, सुपरह्यूमन आहे?'

'12 एप्रिलला दीदी म्हणाल्या...' मोदी म्हणाले, 12 एप्रिलला दीदी म्हणाल्या, 'मी जेथे जातो, तेथे दंगे व्हायला सुरुवात होते. 13 एप्रिलला दीदी पुन्हा एकदा मला सर्वात मोठा खोटारडा म्हणाल्या, मंदबुद्धी म्हणाल्या. ही यादी फार मोठी आहे, मी काहीच शिव्या तुमच्या समोर सादर केल्या आहेत.'

'...तर आज हा दिवस बघण्याची वेळ आली नसती' - नरेंद्र मोदी म्हणाले, अरे दीदी, ओ दीदी, आपण बंगालमधील गरीब जनतेला लुटणाऱ्यांचे कान पिळले असते आणि आपल्या सर्वात प्रिय भावांना उठाबशा काढायला लावल्या असत्या, तर आज हे दिवस बघण्याची वेळ आली नसती.

'बघा मला काय-काय ऐकावे लागते' - पंतप्रधान म्हणाले, की आपणच मला सांगा, मी गप्प बसायला हवे का? जनतेचा आवाज उचलायला हवा की नाही? बहिणींचा आवाज उचलायला हवा की नाही? तरुणांचा आवाज उचलायला हवा की नाही? पण मी जेव्हा बोलतो, तेव्हा आपणच बघा मला काय-काय ऐकावे लागते?

पश्चिम बंगालमध्ये दीदींच्या एका जवळच्या व्यक्तीने एससी वर्गासाठी भिखारी, असा शब्दप्रयोग केला आहे. हा बाबा साहेब आंबेडकर, श्री श्री हरिचन्द ठाकुर, जोगिंद्रनाथ मंडल, यांच्या सारख्या पुण्य आत्म्यांच्या जीवन संघर्षाचा मोठा अपमान आहे, असेही मोदी म्हणाले.