सर्वात वेगवान... देशातील पहिली "नमो भारत' रॅपिड रेल्वे सुरू; जाणून घ्या स्पीड, तिकीट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 12:10 PM2023-10-20T12:10:39+5:302023-10-20T12:19:06+5:30

वंदे भारत नंतर आता देशातील पहिली सर्वात गतीमान ट्रेन सुरू होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते आज या रॅपिड ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. रीजनल रॅपिड ट्रांजिट सिस्टम (आरआरटीएस) चे उद्घाटन आज झाले.

वंदे भारत नंतर आता देशातील पहिली सर्वात गतीमान ट्रेन सुरू होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते आज या रॅपिड ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. रीजनल रॅपिड ट्रांजिट सिस्टम (आरआरटीएस) चे उद्घाटन आज झाले.

दिल्ली ते मेरठ मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही पहिली रॅपिड ट्रेन सुरू होत असून नमो भारत असं या ट्रेनला नाव देण्यात येत आहे. दिल्ली एनसीआर ते गाझियाबाद आणि मेरठ मार्गावर धावणारी ही पहिली रॅपिड रेल्वे असणार आहे.

रॅपिड ट्रेन म्हणजे काय, त्याने काय फरक पडेल आणि त्यातून प्रवाशांना नेमक्या काय सुविधा मिळतील, हे जाणून घेता येईल. पहल्या टप्प्यात साहिबाबाद ते दुहाईपर्यंत १७ किमीपर्यंत लांब मार्गावर प्राथमिकता म्हणून या रेल्वेच्या फेऱ्या होणार आहेत. उद्घाटनापूर्वीच या रॅपिडेक्स ट्रेनची ट्रायलही घेण्यात आली आहे.

रॅपिड ट्रेनने १५२ किमी प्रति तास वेगाने प्रवास केल्याचं निदर्शनास आलं आहे. पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केल्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच ही ट्रेन प्रवाशांसाठी सुरू होत आहे.

रीजनल रॅपिड ट्रांजिट सिस्टम (आरआरटीएस) च्या माध्यमातून राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच ही ट्रेन कार्यरत राहणार आहे. कारण, या क्षेत्रांतील नागरिकांसाठी प्रवासी सुविधा आणि विकासासाठी हा प्रकल्प आहे.

एनसीआरटीसी प्रोजेक्टवर जून २०१९ मध्ये काम सुरू झाला होतं. त्यानंतर, ४ वर्षातच एनसीआरटीसी रॅपिडेक्स सेवा देण्याचं कमर्शियल ऑपरेशन शुरू करण्यात येत आहे.

पहिल्या टप्प्यात ही ट्रेन साहिदाबा से दुहाई मार्गावर सुरू होत आहे. हा १७ किमीचा मार्ग असून या मार्गावर ५ स्टेशन असणार आहेत. ज्यामध्ये, साहिबाबाद, गाझियाबाद, गुलधर, दुहाई आणि दुहाई डेपो हे स्टेशन असणार आहेत.

१६० किमी वेगाने धावणारी ही देशातील पहिली ट्रेन असेल, असा दावा एनसीआरटीसीने केला आहे. मोबाईल आणि कार्डच्या माध्यमातूनच तिकीट खरेदी करता येईल.

या ट्रेनमध्ये आरामदायी व अडजेस्टेबल खुर्च्या आहेत, यासोबतच उभा राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठीही चांगली सोय आहे. मोबाईल चार्जर सुविधा व वायफायही असणार आहे.

या रॅपिड ट्रेनचे तिकीट किती असेल हे तिकीट दरपत्रक समोर आल्यावरच समजेल. मात्र, प्रति किमी २ ते ३ रुपये असा असणार आहे. ३० रॅपिड ट्रेन चालवण्याची तयारी सरकारकडून होत आहे.