आठवीतील विद्यार्थी चाकू घेऊन घरात घुसला, अन् सहावीतील विद्यार्थिनीच्या डोक्याला कुंकू लावला, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 05:50 PM2023-01-12T17:50:39+5:302023-01-12T17:54:03+5:30

Crime News: प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं, असं म्हटलं जातं. गेल्या काही काळात अल्पवयीन मुलांच्या अनेक प्रेमकहाण्या समोर येत आहेत. अशीच एक धक्कादायक प्रेमकहाणी समोर आली आहे. एका आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या घरात फिल्मीस्टाईलमध्ये घुसून तिच्या डोक्याला कुंकू लावल्याच्या प्रकार उघडकीस आला आहे.

प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं, असं म्हटलं जातं. गेल्या काही काळात अल्पवयीन मुलांच्या अनेक प्रेमकहाण्या समोर येत आहेत. अशीच एक धक्कादायक प्रेमकहाणी समोर आली आहे. एका आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या घरात फिल्मीस्टाईलमध्ये घुसून तिच्या डोक्याला कुंकू लावल्याच्या प्रकार उघडकीस आला आहे.

उत्तर प्रदेशमधून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील महाराजगंज जिल्ह्यामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. एका विद्यार्थ्याने विद्यार्थिनीच्या घरात घुसून चाकूचा धाक दाखवत तिच्या डोक्याला कुंकू लावला. या मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर अल्पवयीन विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार महाराजगंज पोलीस ठाण्याचे प्रभारी रवि कुमार राय यांनी सांगितले की, आरोपी मुलगा त्याच्या एका मित्रासोबत १४ वर्षांच्या मुलीच्या घरी अचानक गेला होता. ही मुलगी त्यावेळी घरात झाडू मारत होती.

या दोन मुलांना पाहून मुलगी घाबरली होती. तेव्हाच त्यातील एकाने तिच्या गळ्याला चाकू लावला. त्यानंतर सोबत आणलेले कुंकू तिच्या डोक्यात भरले. हे पाहून ही मुलगी घाबरली आणि तिने आरडा ओरडा सुरू केला.

मात्र तिथे कुणीतरी पोहोचेपर्यंत दोन्ही मुलगे तिथून फरार झाले. संध्याकाळी या मुलीचे वडील घरी आले. तेव्हा त्यांना या मुलीने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली.

महाराजगंज पोलीस ठाण्यातील प्रभारींनी सांगितले की, पीडित मुलीच्या वडिलांनी तक्रार नोंदवली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर मुलाची ओळख पटवण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी या मुलाचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले आहे.

आरोपी मुलाला बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले आहे. त्यानंतर त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, सदर मुलगा हा गेल्या तीन महिन्यांपासून या मुलीच्या मागे लागलेला होता. आता घाबरलेल्या आई-वडिलांनी मुलीचा दाखला दुसऱ्या शाळेत घातला आहे.