वाचा फक्त भारतात घडणाऱ्या 'या' 9 गोष्टी, नक्कीच तुम्हाला माहीत नसतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 06:46 PM2018-03-23T18:46:23+5:302018-03-23T18:46:23+5:30

मुंबई : ‘हे फक्त भारतातच होऊ शकतं’, असं आपण बऱ्याचदा गंमतीजंमतीत म्हणत असतो. पण खरंच अशा अनेक गोष्टी आहेत ज्या फक्त भारतातच घडतात. त्या काहीशा विचित्र किंवा गंमतीदार असल्या तरी तितक्याच हटके आहेत. पाहूया आपल्याकडच्या अशा काही गोष्टी ज्या कदाचित तुम्हाला माहीत नसतील.

१) गर्भवती महिलेला कामावरून काढून टाकण्यात येऊ शकत नाही.

२) तुम्ही कोणत्याही हॉटेलमध्ये कोणत्याही वेळेला पाणी मागू शकता किंवा त्यांचे वॉशरूम वापरू शकता.

३) डेप्युटी कमिशनर किंवा कमिशनरला सरळ मेल किंवा पोस्टाने पत्र पाठवून महिला आपली तक्रार दाखल करू शकते.

४) अटक केलेल्या आरोपीला अटकेच्या २४ तासांच्या आतच न्यायाधीशांसमोर हजर करणे बंधनकारक असते.

५) प्रॉपर्टीचे वाटप करताना वारसदार म्हणून मुलाइतकंच वाटा मुलीलाही मिळणे बंधनकारक आहे.

६) लग्नाला एक वर्ष पूर्ण होण्याआधी कोणतंही जोडपं घटस्फोटासाठी अर्ज करू शकत नाही.

७) कोणालाही अटक करताना किंवा चौकशी करताना पोलीस अधिकाऱ्याला आपले आयडी बाळगणे बंधनकारक असते.

८) सूर्योदयाआधी आणि सूर्योदयानंतर महिला आरोपीला अटक करता येत नाही.

९) सर्वांसमोर महिलेला तिच्या परवानगीने किस करणं किंवा मिठी मारणं हा कायद्याने गुन्हा नाहीये.