तब्बल 800 किलोची 'भगवद्‌गीता'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 06:28 PM2019-02-27T18:28:21+5:302019-02-27T18:35:25+5:30

दिल्लीतील इस्कॉन मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी विशाल भगवद्‌गीतेचे अनावरण झाले.

या भगवद्‌गीतेचे 'एस्टांउडिंग भगवद्‌गीता' असे नामकरण करण्यात आले आहे.

इस्कॉनकडून मिळालेल्या माहितीनुसार, भगवद्‌गीता 670 पानांची असून, तिचे वजन 800 किलो आहे. तसेच, या भगवद्‌गीतेचा आकार 2.8 मीटर X 2 मीटर आहे.

या भगवद्‌गीतेला जगातील सर्वात मोठे धार्मिक व पवित्र पुस्तक म्हणून सादर केले जाणार आहे.

भगवद्‌गीतेचे उद्घाटन केल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी एका कार्यक्रमाद्वरे जनतेला संबोधित केले.

इस्कॉन मंदिरात पोहचण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी मेट्रोमधून प्रवास करताना दिसून आले.