शिर्डीत रामनवमीचा उत्साह

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2018 09:11 PM2018-03-24T21:11:36+5:302018-03-24T21:11:36+5:30

श्रीरामनवमी उत्सवानिमित्त श्रींची प्रतिमा, पोथी व विनाची मिरवणूक काढण्यात आली.

श्रीरामनवमी उत्सवानिमित्त समाधी मंदिरात मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल यांनी सहपरिवार श्रींची विधीवत पाद्यपूजा केली.

श्रीरामनवमी उत्‍सवाच्‍या औचित्‍यावर श्रींच्‍या नित्‍यांच्‍या आरतीसाठी मुंबई साईभक्‍त श्री.जयंतभाई यांनी ३९ लाख १ हजार ६८८ रुपये किंमत असलेली १३५१ ग्रॅम वजनाची सोन्‍याची पंचारती देणगी स्‍वरुपात दिली आहे.

श्रीरामनवमी उत्सवानिमित्त मंदिराच्या प्रवेशद्वारावर श्री.द्वारकामाई मंडळ, मुंबई यांनी उभारलेला देखावा व विद्युत रोषणाई.

श्रीरामनवमी उत्सवानिमित्त मंदिराला करण्यात आलेली विद्युत रोषणाई.

श्रीरामनवमी उत्सवानिमित्त श्री साईबाबा समाधी मंदिर व परिसरात दिल्‍ली येथील देणगीदार साईभक्‍त श्रीमती स्‍नेहा शर्मा यांच्‍या देणगीतुन करण्‍यात आलेली आकर्षक फुलांची सजावट.